यवतमाळ - दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी कृषी कायद्याविरोधात यवतमाळ येथील बसस्थानक चौकात विविध संघटनांनी निदर्शने केली. यावेळी नरेंद्र मोदींविरोधी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. शेतकऱ्यांनी ही लढाई आरपारची केली असून तिन्ही कृषी कायदे रद्द केल्याशिवाय मागे हटणार नाही, अशी भूमिका दिल्लीतील शेतकऱ्यांनी घेतलेली आहे. याला यवतमाळ जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला.
भारत बंद : यवतमाळ जिल्ह्यातील १६ तालुक्यांत आंदोलन - farmers law news
शेतकऱ्यांनी ही लढाई आरपारची केली असून तिन्ही कृषी कायदे रद्द केल्याशिवाय मागे हटणार नाही, अशी भूमिका दिल्लीतील शेतकऱ्यांनी घेतलेली आहे. याला यवतमाळ जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला.
कायदा रद्द होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार
दहा दिवसांपासून लाखोंच्या संख्येने पंजाब, हरयाणा, उत्तर प्रदेशसह देशातील अनेक राज्यांमधील शेतकऱ्यांनी राजधानी दिल्लीच्या सीमांवर आंदोलन छेडले आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या रास्त असून त्यांना न्याय मिळेपर्यंत आम्ही त्यांच्यासोबत असल्याची भूमिका यवतमाळ जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्ष, संघटना व सामाजिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घेतली. यवतमाळ जिल्ह्यातील 16 तालुक्यात हे आंदोलन सुरू असून कुठे चांगला तर कुठे संमिश्र प्रतिसाद मिळत आहे.