यवतमाळ - राळेगाव येथे वाहनांची तपासणी सुरू असताना एका वाहनातून गो-तस्करी होत असल्याचे समोर आले आहे. याप्रसंगी पोलिसांनी कारवाई करत आठ गायींची सुटका केलीय.
नाकाबंदी दरम्यान गो तस्करीच्या पर्दाफाश; तीन लाख 21 हजारांचा मुद्देमाल जप्त
राळेगाव येथे वाहनांची तपासणी सुरू असताना एका वाहनातून गो-तस्करी होत असल्याचे समोर आले आहे. याप्रसंगी पोलिसांनी कारवाई करत आठ गायींची सुटका केलीय.
राळेगाव येथे पोलिसांची गस्त सुरू होती. पोलीस कर्मचारी नामदेव धुर्वे, उत्तम बावणे, संजय कोहाड हे वसंत जिनिंग पॉईंट परिसरात नाकाबंदीवर तपासणी करत होते. यावेळी मेटीखेडा रस्त्यावरून येणाऱ्या एका वाहनाची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये आठ गायी होत्या. याची एकूण किंमत ४६ हजार रुपये आहे.
पोलिसांनी वाहन व गायी असा एकूण 3 लाख 21 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपी शेख नवाज दादामिया कुरेशी (30, रा. उमरी ता. पांढरकवडा) यास ताब्यात घेण्यात असून त्याच्यावर गुन्हा नोंदवण्यात आलाय. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक डी.जी. पोटभरे करत आहेत.