यवतमाळ - जिल्ह्यात कोरोना व्हायरसला प्रतिबंध करण्यासाठी युद्धपातळीवर जिल्हा प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. बार, रेस्टॉरंट चालू ठेवण्याच्या वेळा रात्री आठ वाजेपर्यंतच करण्यात आल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
जिल्ह्यातील नागरिकांची होणारी गर्दी टाळण्यासाठी यवतमाळ जिल्ह्यामध्ये सभा, मेळावे, उपोषण, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, धार्मिक, क्रीडा आदी कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली होती. आता नगरपालिका, नगरपंचायत जवळपास असलेल्या सर्व रेस्टॉरंट, बार, खानावळ, धाबा यांची बंद करण्याची वेळ कमी करण्यात येऊन रात्री आठ वाजता त्यांना बंद करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी एम. डी. सिंग यांनी दिले आहेत.
रात्री आठनंतर निर्देश दिलेले आस्थापना सुरू असल्यास त्यांच्यावर साथरोग प्रतिबंधात्मक 1897 कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार आहे.