यवतमाळ :देशी कट्ट्यातून हवेत गोळीबार (Firing in the air from a native katta) करीत बार मालकाच्या पुतण्यावर कुख्यात कवट्या टोळीने प्राणघातक हल्ला (Bar owners nephew Gunshot) केला होता. या टोळीतील आठही सराईत गुन्हेगारांवर मकोका अन्वये स्थानबद्धतेची कारवाई (Mokka act against accused ) करण्यात आली. अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस उपमहानिरीक्षक चंद्रकिशोर मिना यांनी 30 नोव्हेंबरला मकोका प्रस्तावाला मान्यता दिली. त्यामुळे आता या टोळीच्या मुसक्या पुरत्या आवळल्या गेल्या आहे. Latest news from Yavatmal, Yavatmal Crime
बिअर बारमध्ये धुमाकूळ घालताना गुंड हे आहेत आरोपी :शेख अलीम शेख कलीम ऊर्फ कवट्या, शेख इमरान शेख शरीफ ऊर्फ कांगारु, रोहित अरविंद जाधव, नयीम खान गुलाब नबी खान ऊर्फ टमाटर, आदेश ऊर्फ आद्या अनिल खैरकार, साजिद ऊर्फ रिज्जू सलिम सयानी, असलम खान अकबर खान ऊर्फ मारी, नयन नरेश सौदागर सर्व रा. यवतमाळ अशी मकोका अंतर्गत स्थानबद्धतेची कारवाई झालेल्या कवट्या टोळीतील आठ सराईत गुन्हेगारांची नावे आहेत.
बारच्या बिलावरून वाद :3 सप्टेंबरला येथील छोटी गुजरी परिसरातील शिवनाथ वाईनबारमध्ये यथेच्छ मद्य ढोसल्यानंतर संबंधित आठ जणांनी बार मालकाच्या पुतण्याशी बिल मागितल्याच्या वादातून प्राणघातक हल्ला केला. तसेच देशी कट्ट्यातून हवेत गोळीबार केला होता. घटनेनंतर शहर पोलिसांनी संबंधित आठ जणांविरुद्ध भादंवि 307, 384, 143, 147, 148, 149, 506, 120 (ब) आणि भारतीय शस्त्रास्त्र प्रतिबंधक कायद्याच्या 3 (25) (27), 35 आणि मुंबई पोलीस कायद्याच्या 135 कलमान्वये गुन्हा दाखल केला होता. आत्तापर्यंत या टोळीतील सात जणांना अटक करण्यात आली. मात्र, आरोपी नयन सौदागर हा अद्यापही पसार आहे. त्याचा युद्ध पातळीवर पोलीस शोध घेत आहे.
कुख्यात कवट्याच्या मुसक्या आवळल्या :या टोळीतील सात जणांना बेड्या ठोकल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. पवन बनसोड आणि अप्पर पोलीस अधीक्षक पियूष जगताप यांनी या टोळीविरुद्ध मकोका कायद्यान्वये प्रस्ताव तयार करण्याचे आदेश दिले होते. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी यांनी हा प्रस्ताव तयार करून अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस उपमहानिरीक्षक चंद्रकिशोर मिना यांच्याकडे मान्यतेसाठी पाठविला होता. त्या प्रस्तावाला 30 नोव्हेंबरला डीआयजी मिना यांनी मान्यता दिली. त्यामुळे आता या कवट्या टोळीतील संपूर्ण सदस्यांच्या मुसक्या पुरत्या आवळल्या गेल्या आहे. ए
गुन्हेगारी वर्तुळात खळबळ :एकाचवेळी आठ जणांविरुद्ध मकोका अंतर्गत कारवाई करण्याची बहूदा जिल्हा पोलीस दलातील ही पहिलीच घटना असावी, या कारवाईने यवतमाळच्या गुन्हेगारी वर्तुळातील अनेकांचे धाबे दणाणले आहेत.