यवतमाळ : यवतमाळच्या बांशी ग्रामपंचायतच्या ग्रामसभेत किशोरवयीन मुलांना मोबाईल बंदी करण्यात आली ( Banshi Gram Panchayat decided Mobile Phone Ban ) असून बांशी हा निर्णय घेणारी महाराष्ट्रातील पहिली ग्रामपंचायत ठरली आहे. पुसद तालुक्यातील साग जंगलाला लागून असलेल्या बांशी गावात ११ नोव्हेंबर रोजी ही ग्रामसभा पार पडली. या ग्रामसभेत काही महत्वपूर्ण निर्णय घेण्यात ( Banshi Gram Panchayat Yavatmal ) आले.
ग्रामविकास योजना :पंचायत राजमुळे लोकशाहीत ग्रामपंचायतला मोठे अधिकार प्राप्त झाले आहे. ग्रामविकास योजना राबविताना ग्रामसभेतील ठरावांना महत्त्व आले ( Mobile Phone Ban For Teenagers ) आहे. ग्राम विकासासोबतच समाज स्वास्थ्य तंदुरुस्त राहण्यासाठी काही ग्रामपंचायती ग्रामसभेत आगळेवेगळे ठराव घेत अंमलबजावणी करतात. यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील बांशी ग्रामसभेने असाच एक वेगळा प्रयोग केला आहे. किशोरावस्थेतील नवीन पिढी मोबाईलच्या आहारी गेली आहे. त्याचे अनिष्ट परिणाम रोखण्यासाठी बांशी ग्रामसभेत अठरा वर्षाखालील मुला-मुलींना मोबाईल वापरण्याची बंदी घातली आहे.