महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

यवतमाळमध्ये बैलपोळा उत्साहात साजरा; उत्कृष्ट ठरणार्‍या 10 बैलजोड्यांना 50 हजारांचे बक्षीस - झडत्या

मान्यवरांच्या हस्ते उत्कृष्ट बैलजोडी विजेत्यांना सन्मानित करण्यात आले. या स्पर्धेत एकूण 95 बैलजोड्या सहभागी झालेल्या होत्या. संजय मादेशवार यांच्या बैलजोडीला 15 हजार रुपयांचा पुरस्कार मिळाला. दहा हजारांचा द्वितीय पुरस्कार अंकुश बगमारे, तृतीय क्रमांकाचा सात हजारांचा पुरस्कार दीपक सिंगेवार, पाच हजारांचा चतुर्थ पुरस्कार नामदेव अवथळे यांना देण्यात आला.

बैलपोळा

By

Published : Aug 31, 2019, 9:33 AM IST

यवतमाळ- येथील आझाद मैदानात शुक्रवारी नगरपालिकेतर्फे बैल पोळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यात उत्कृष्ट ठरणार्‍या एकूण दहा बैलजोड्यांसाठी 50 हजारांचे बक्षीस नगरपालिकेतर्फे जाहीर करण्यात आले. तीन सदस्यांच्या समितीने या स्पर्धेचे परीक्षण केले.

हेही वाचा - 'माझ्या सर्जा रं...माझ्या राजा रं...' बैलपोळ्यानिमित्त बघा ईटीव्ही भारतचा स्पेशल रिपोर्ट

या परीक्षकांमध्ये अ‍ॅड. जयसिंग चव्हाण, अ‍ॅड. रवींद्र भुमरे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. चव्हाण यांचा समावेश होता. पोळा म्हटले म्हणजे झडत्या आल्याच. याही पोळ्यात विविध झडत्या सादर करून शेतकर्‍यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त केली. अनुदान गेलं कर्मचार्‍यांच्या घरी, शेतकर्‍यांच्या हाती दिल्या तुरी, अशा झडत्यांनी पोळ्याच्या उत्साहात रंगत आणली.

यवतमाळमध्ये बैलपोळा उत्साहात साजरा

हेही वाचा - बैलपोळा दुष्काळात; शेतकऱ्यांच्या 'राजा'ला घागरभर पाण्यातच अंघोळ

“दुस्काय रे दुस्काय, इदर्भाचा दुस्काय
त्या दुस्कायात कास्तकाराचे येले सुरू
कापूस, सोयाबीन, तुरीले नाई आला भाव
आता काय सायेब आमी, काय खाव”

नगरसेवक बबलू देशमुख यांनी सादर करून सरकारी धोरणांवर ताशेरे ओढले. याशिवाय संजय माघाडे, विठ्ठल राठोड यांनी झडत्या सादर करून शेतकर्‍यांचा उत्साह वाढवला.

हेही वाचा - बेंदूर सणावर दुष्काळाचे सावट, चारा छावणीत सण साजरा करण्याची शेतकऱ्यांवर वेळ

मान्यवरांच्या हस्ते उत्कृष्ट बैलजोडी विजेत्यांना सन्मानित करण्यात आले. या स्पर्धेत एकूण 95 बैलजोड्या सहभागी झालेल्या होत्या. संजय मादेशवार यांच्या बैलजोडीला 15 हजार रुपयांचा पुरस्कार मिळाला. दहा हजारांचा द्वितीय पुरस्कार अंकुश बगमारे, तृतीय क्रमांकाचा सात हजारांचा पुरस्कार दीपक सिंगेवार, पाच हजारांचा चतुर्थ पुरस्कार नामदेव अवथळे यांना तर तीन हजारांचा पुरस्कार पिंटू ठाकरे यांना मिळाला. रमेश यमनवार, अविनाश ठाकरे, राजेश ठाकरे, दिनेश तिवाडे, अजय रापर्तीवार यांना प्रत्येकी दोन हजारांचे प्रोत्साहनपर पारितोषिक मिळाले. सहभागी शेतकऱयांना श्रीफळ व धोतर देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी मंचावर नगरपालिकेतील बांधकाम सभापती विजय खडसे, नगरसेवक गजानन इंगोले, उद्धव साबळे, पंकज देशमुख, नित्यानंद गिरी, राजने, वैशाली कनाके, कीर्ती राऊत, प्रा. बबलू देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details