यवतमाळ- राळेगाव तालुक्यातील आदर्श गाव म्हणून गुजरी गावाची ओळख आहे. ग्रामगीताचार्य दिवंगत तुकारामदादा यांनी गुजरी गावाला बऱ्याचदा भेटी दिल्या. मात्र, याच गावच्या नागरिकांनी केलेली रस्त्याची मागणी गेल्या 5 वर्षापासून पूर्ण झाली नाही.
राळेगाव ते गुजरी रस्त्याची दुर्दशा हेही वाचा - यवतमाळ विधानसभा मतदारसंघ : भाजप, काँग्रेससाठी प्रतिष्ठेची लढाई, तर शिवसेना बंडखोरीच्या तयारीत?
या रस्त्याला ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. रस्त्याच्या कडा बऱ्याच ठिकाणी खचल्या आहेत. दुचाकी-चारचाकी व शिक्षणासाठी तालुक्याला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.
हेही वाचा - यवतमाळ : जिल्हाधिकारी कार्यालयावर जप्तीची नामुष्की टळली
जिल्हापरिषद बांधकाम विभागाने मागील वर्षी थातुर-मातुर डागडुजीचे काम केले. मात्र, तरीही रस्ते थोड्याच दिवसात खराब झाले. हे काम निकृष्ट दर्जाचे करण्यात आले असल्यामुळे राळेगाव ते गुजरी या रस्त्याचे काम पंतप्रधान ग्राम सडक योजनेतून त्वरित करण्यात यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. पदाधिकारी व प्रशासनाकडे वारंवार रस्त्याची मागणी करण्यात आली. पण, त्याला सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला नाही, असेही नागरिकांनी सांगितले.