यवतमाळ - शेतकऱ्यांची बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या दारव्हा येथील शाखेत कोरोना विषाणूच्या संसर्गपासून बचाव करण्यासाठी 'हात धुवा...' उपक्रम राबवण्यात येत आहे. अगोदर हात धुवा आणि नंतरच बँकेत प्रवेश करा, अशा सूचना शेतकरी, खातेदार आणि कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या दारव्हा शाखेत कोरोनाबाबत जनजागृती.... हेही वाचा...सीताबर्डीला भय ना कोरोनाचे, ना प्रशासनाचे; कलम १४४चे उल्लंघन करत सजला बाजार
कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये, यासाठी नागरिकांना मास्क घालणे तसेच वारंवार हात धुण्यासाठी सूचना करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत हात धुवा आणि नंतरच बँकेत प्रवेश करा, हा उपक्रम राबवण्यात येत आहे. बँकेच्या खातेदारांना हात धुवून नंतर बँकेत प्रवेश देण्यात येत असून शेतकरी सभासदांमध्ये जनजागृती करण्यात आली आहे.
हेही वाचा...कोरोनाने जगभरातील २.५ कोटी लोकांच्या नोकऱ्यांवर टांगती तलवार
शेतकऱ्यांची बँक म्हणून समजली जाणारी यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या दारव्हा शाखेतील अधिकाऱ्यांनी कोरोनासोबत लढा देण्यासाठी जनजागृती केली. बँकेत नेहमीच गर्दी पहायला मिळते. त्यामुळे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बँकेत आलेल्या खातेदारांना स्वच्छ हात धुण्यास सांगून नंतर प्रवेश देण्यात आला. या उपक्रमाचे खातेदारांनी देखील कौतुक केले आहे.