यवतमाळ - पुसद तालुक्यातील बोरगडी ग्रामपंचायतचे पॅनलप्रमुख ओंकार शिंदे यांनी पंचायत समितीच्या वरिष्ठांशी संपर्क साधून शौचालयाबाबत माहिती देण्यात यावी अशी वारंवार अर्ज व विनंती केली. मात्र तरीही माहिती न मिळाल्यामुळे पॅनलप्रमुख ओंकार शिंदे यांनी पंचायत समितीची आमसभा सुरू असताना अंगावर रॉकेल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
यवतमाळमध्ये पंचायत समितीच्या आवारातच पॅनलप्रमुखांचा आत्महत्येचा प्रयत्न - यवतमाळ लेटेस्ट न्यूज
पुसद तालुक्यातील बोरगडी ग्रामपंचायतचे पॅनलप्रमुख ओंकार शिंदे यांनी पंचायत समितीच्या वरिष्ठांशी संपर्क साधून शौचालययाबाबत माहिती देण्यात यावी अशी वारंवार अर्ज व विनंती केली. मात्र तरीही माहिती न मिळाल्यामुळे पॅनलप्रमुख ओंकार शिंदे यांनी पंचायत समितीची आमसभा सुरू असताना अंगावर रॉकेल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
![यवतमाळमध्ये पंचायत समितीच्या आवारातच पॅनलप्रमुखांचा आत्महत्येचा प्रयत्न पंचायत समितीच्या आवारातच आत्महत्येचा प्रयत्न](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-12480771-67-12480771-1626441894584.jpg)
15 दिवसापासून उडवाउडवीची उत्तरे -
बोरगडी ग्रामपंचायतच्या सदस्या सीमा खडसे (रा.बोरगडी) यांच्या घरी शौचालय बांधलेले व वापरात आहे का किंवा नाही याबाबत माहिती देण्यात यावी. अशा आशयाचे अर्ज संतोष राजारामजी भालेराव, बाबासाहेब किशोर शिंदे (रा. बोरगडी) यांनी बोरगडी सरपंच व सचिव यांच्याकडे केला होता. मात्र सचिव यांनी अर्जदारास माहिती देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे बोरगडी ग्रामपंचायतचे पॅनलप्रमुख ओंकार शिंदे यांनी पंचायत समितीच्या वरिष्ठांशी संपर्क साधून याबाबत माहिती देण्यात यावी, अशी विनंती केली. मात्र सचिवांनी गटविकास अधिकाऱ्यांची मार्गदर्शन मागितले. आज त्या गोष्टीला 15 दिवस लोटल्याने तरीही माहिती न मिळाल्यामुळे आज सायंकाळी चार वाजताच्या दरम्यान पॅनलप्रमुख ओंकार शिंदे यांनी पंचायत समितीची आमसभा सुरू असताना अंगावर रॉकेल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यावेळी सहाय्यक गटविकास अधिकारी यांनी ओंकार शिंदे यांना आश्वासन दिले की तात्काळ पाच लोकांची समिती नेमून एका तासाच्या आत स्पॉट पंचनामा करून तुम्हाला अहवाल देतो. या घटनेमुळे पंचायत समिती परिसरात एकच खळबळ उडाली.
हेही वाचा- संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी उद्योग क्षेत्राचे नियोजन करा; मुख्यमंत्र्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना