महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

यवतमाळमध्ये सहायक प्राध्यापकाचा आत्महत्या करण्याचा प्रयत्न - जगदंबा अभियांत्रिकी महाविद्यालय यवतमाळ

सहायक प्राध्यापकाने गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही घटना आज दुपारी महाविद्यालयातील रसायनशास्त्र प्रयोगशाळेत उघडकीस आली. मोहम्मद वसीम असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या सहायक प्राध्यापकाचे नाव आहे.

यवतमाळ
यवतमाळ

By

Published : Dec 26, 2020, 6:50 PM IST

यवतमाळ- येथील जगदंबा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सहायक प्राध्यापकाने गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही घटना आज दुपारी महाविद्यालयातील रसायनशास्त्र प्रयोगशाळेत उघडकीस आली. मोहम्मद वसीम असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या सहायक प्राध्यापकाचे नाव आहे. ते जगदंबा अभियांत्रिकी महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागात कार्यरत आहेत.

यवतमाळ

सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
कोरोनामुळे अभियांत्रिकी महाविद्यालये मागील आठ महिन्यांपासून बंद होते. नुकतीच विद्यापीठांकडून विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्याचे आदेश मिळाल्याने सर्व प्राध्यापक महाविद्यालयात नियोजन करीत होते. अशातच मासिक वेतन आणि सातव्या वेतन आयोगाचा लाभ व इतर सेवा मिळत नसल्याने ते मानसिक तणावाखाली होते. त्यामुळे त्यांनी टोकाचे पाऊल उचलून प्रयोगशाळेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तत्पूर्वी, त्यांनी एक व्हिडिओ तयार केला. तो सोशल मीडियावर अवघ्या काही सेकंदातच व्हायरल झाला.
प्राचार्य, सचिवांच्या त्रासाला कंटाळलो
जगदंबा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सचिव डॉ. शीतल वातिले आणि प्राचार्य डॉ. हेमंत बारटकर यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचा आरोप यावेळी सहायक प्राध्यापक मोहम्मद वसीम यांनी केला आहे. आपल्याला वेतन दिले नाही. 25 डिसेंबर रोजी सुटी असताना 24 डिसेंबरला नातेवाईकाच्या अंत्यसंस्कारासाठी गेलो असल्याची माहिती दिली होती. तरीदेखील महाविद्यालयाने 'शोकॉज' नोटीस बजावली आहे. घडल्याप्रकाराला डॉ. वातिले आणि प्राचार्य दोघेही कारणीभूत असल्याचा उल्लेख व्हिडिओत केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details