यवतमाळ -दारूबंदीमुळे अनेक ठिकाणी दारू माफिया निर्माण झाले आहेत. राज्याला 17 हजार कोटींचा महसूल फक्त दारूतून मिळतो. त्यामुळे दारूबंदी ऐवजी प्रबोधन करणे कधीही चांगले असल्याचे मत विजय वडेट्टीवार यांनी मांडले आहे. विजय वडेट्टीवार हे शनिवारी यवतमाळ जिल्हा दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधला.
चंद्रपूर जिल्ह्यात शाळकरी मुलांच्या दप्तरातून दारू तस्करी केली गेली. आता चंद्रपूर जिल्ह्यात ड्रग्स वाढले आहे. तसेच दारू तस्करी करणाऱ्यांनी जंगलातून मार्ग काढले आहे. दारूबंदीचा चंद्रपूर जिल्ह्याला काही फायदा झाला नाही. त्यामुळे आता दारूबंदी करायची असेल तर संपूर्ण महाराष्ट्रात करावी, असे वक्तव्य राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले.