महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गरजुंसाठी ऑक्सिजन सिलिंडरची व्यवस्था; पांढरकवडा शहरात व्यापारी संघटनेचा पुढाकार

कोविड केअर सेंटरमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा न मिळाल्याने रुग्ण दगावण्याची शक्‍यता जास्त असते. या गरजवंत रुग्णांची अडचण लक्षात घेऊन व्यापारी संघटनेने ऑक्सिजन सिलिंडरची व्यवस्था केली आहे. बाधित रुग्णांना यवतमाळ वर्धा व नागपूर या ठिकाणी उपचारासाठी नेत असताना ऑक्सिजनची गरज भासल्यास ही सुविधा त्यांना देण्यात आली आहे.

arrangement of oxygen cylinders for needy by trade association in pandharkavada city
गरजूंसाठी ऑक्सिजन सिलिंडरची व्यवस्था; पांढरकवडा शहरात व्यापारी संघटनेचा पुढाकार

By

Published : Oct 6, 2020, 8:54 PM IST

यवतमाळ - कोरोनाचा संसर्ग वाढत चालला आहे. गरजू व्यक्तीला ऑक्सिजन सिलिंडर मिळत नाही. ही बाब लक्षात आल्याने व्यापारी संघटनेने ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. महात्मा गांधी यांच्या जयंती पासून हा उपक्रम सुरू करण्यात आला.

गरजुंसाठी ऑक्सिजन सिलिंडरची व्यवस्था; पांढरकवडा शहरात व्यापारी संघटनेचा पुढाकार

कोरोनाचा संसर्ग आणि मृत्यूमुळे लोक भयभीत झाले आहेत. गोरगरीब रुग्णाला वेळेवर ऑक्सिजन सिलिंडर मिळत नाही. त्यामुळे त्यांचा मृत्यू होतो. ही अडचण लक्षात घेऊन व्यापारी संघटनेने ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध करून दिले. पांढरकवडा शहराचा तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोविड केअर सेंटरमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा न मिळाल्याने रुग्ण दगावण्याची शक्‍यता जास्त असते. या गरजवंत रुग्णांची अडचण लक्षात घेऊन व्यापारी संघटनेने ऑक्सिजन सिलिंडरची व्यवस्था केली आहे. बाधित रुग्णांना यवतमाळ वर्धा व नागपूर या ठिकाणी उपचारासाठी नेत असताना ऑक्सिजनची गरज भासल्यास ही सुविधा त्यांना देण्यात आली आहे.
महात्मा गांधी यांच्या जयंती पासून हा उपक्रम सुरू केला. यावेळी शेतकरी नेते किशोर तिवारी, पोलीस अधिकारी यांच्यासह व्यापारी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details