महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

यवतमाळमध्ये कोरोनाच्या परिस्थितीत सुमित्राबाई ठाकरे हॉस्पिटलमध्ये दोनशे खाटांची व्यवस्था

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे यांनी नर्सिंग महाविद्यालयाशी संलग्न असलेल्या सुमित्राबाई ठाकरे हॉस्पिटल गरजवंत रुग्णांच्या सेवार्थ शासनास दिले आहे. या हॉस्पिटलमध्ये 200 बेडचे कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे.

Sumitrabai Thackeray Hospital
सुमित्राबाई ठाकरे हॉस्पिटल

By

Published : Apr 30, 2021, 12:25 PM IST

यवतमाळ - जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने वाढत आहे. रुग्णांची गर्दी व बेडचा अभाव यामुळे होणारी गैरसोय लक्षात घेऊन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे यांनी नर्सिंग महाविद्यालयाशी संलग्न असलेल्या सुमित्राबाई ठाकरे हॉस्पिटल गरजवंत रुग्णांच्या सेवार्थ शासनास दिले आहे. या हॉस्पिटलमध्ये 200 बेडचे कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. संस्थेचे अध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या हस्ते कोविड सेंटरचे उद्घाटन करण्यात आले.

शल्यचिकित्सक कार्यालयाकडून प्रशिक्षित डॉक्टर, नर्स, कर्मचारी वर्ग तातडीने उपलब्ध करून देण्यात आला आहे. येथे औषधसाठ्यासह ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात आला आहे. कोविड रुग्णांना मदत व्हावी, या उद्देशाने संस्थेचे दोनशे बेडचे हॉस्पिटल त्याचप्रमाणे नर्सिंग कॉलेजची पूर्ण इमारत शासनास कोविड रुग्णांच्या सेवार्थ सोपविण्यात येणार आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी दिली. त्याचप्रमाणे हॉस्पिटलमध्ये भरती होणार्‍या रुग्णांच्या नातेवाइकांना दोन वेळचे जेवणही संस्थेच्यावतीने मोफत पुरविण्यात येणार आहे.

हेही वाचा - मुंबई आयआयटीकडून देशाला मोठा दिलासा; नायट्रोजन युनिटचे ऑक्सिजन युनिटमध्ये यशस्वी रूपांतरणाचा प्रयोग

ABOUT THE AUTHOR

...view details