महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

यवतमाळ : दारुची तल्लफ भागविण्याकरता सॅनिटायझर पिल्याने आणखी एकाचा मृत्यू

सॅनिटायझमध्ये अल्कोहल असल्याने काही मद्यपी सॅनिटायझर पिण्याचे प्रयत्न करत असल्याचे यापूर्वीही दिसून आले. सॅनिटायझरमध्ये हानिकार रसायने असल्याने व्यसनी लोकांना जीव गमवावा लागत आहे.

By

Published : Apr 27, 2021, 7:35 PM IST

Updated : Apr 27, 2021, 7:45 PM IST

Another alcoholic dies after drinking sanitizer
सॅनिटायझर पिल्याने आणखी एकाचा मृत्यू

यवतमाळ- लॉकडाऊनमध्ये मद्यपी व्यसनासाठी टोकाचे पाऊल उचलताना दिसत आहेत. वणी येथे चार दिवसापुर्वीच सॅनिटायझर प्राशन केल्याने तब्बल सात व्यक्तींना आपला जीव गमवावा लागला होता. तर आज पुन्हा एका व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला. अनिल चंपत गोलाईत( 49, रा. माळीपुरा) असे मृताचे नाव आहे.


वणी येथे सॅनिटायझर पिऊन सात नागरिकांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आज पुन्हा मोलमजुरी करणाऱ्या अनिल गोलाइत याने व्यवसनासाठी सॅनिटायझर पिले.तो मजूूूरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवत होता. मात्र, दारूचे व्यसन जडले असल्याने त्याला दैनंदिन कामे करणे अवघड होत होते. घटनेच्या दिवशी चक्क सॅनिटायझरचा घोट गळ्यात त्याने उतरविला. यामध्येच मजुराला जीव गमवावा लागला. सॅनिटायजर पिल्याने मागील चार दिवसांत आठ जणांना जीव गमवावा लागला आहे.

दारुची तल्लफ भागविण्याकरता सॅनिटायझर पिल्याने आणखी एकाचा मृत्यू

हेही वाचा-यवतमाळातील सॅनिटायझर प्रकरणी अखेर दोन वैद्यकीय अधिकारी निलंबित

दरम्यान, कोरोनाच्या काळात विषाणुपासून बचाव होण्यासाठी सॅनिटायझरचा वापर हात स्वच्छ करण्यासाठी करण्यात येतो. मात्र, सॅनिटायझमध्ये अल्कोहल असल्याने काही मद्यपी सॅनिटायझर पिण्याचे प्रयत्न करत असल्याचे यापूर्वीही दिसून आले. सॅनिटायझरमध्ये हानिकार रसायने असल्याने व्यसनी लोकांना जीव गमवावा लागत आहे.

यापूर्वी सहा जणांचा मृत्यू

लॉकडाऊनमध्ये दारूची दुकाने बंद आहेत, त्यामुळे दारूची गरज भागविण्यासाठी सॅनिटायझर पिल्याने वणीमध्ये सहा जणांचा मृत्यू झाला होता. दत्ता लांजेवार, नूतन पाथरटकर, गणेश शेलार, संतोष मेहर, सुनील ढेंगळे यासह एका व्यक्तीचा सॅनिटायझर पिल्याने मृत्यू झाला होता.

हेही वाचा-वनी सॅनिटायझर प्राशन प्रकरण: मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांची पोलीस अधीक्षकांनी घेतली भेट

सॅनिटायझरमधील अल्कोहोल आरोग्य रक्षणासाठी - पोलीस अधीक्षक भुजबळ

कोरोनापासून बचाव करण्यासाठी सॅनिटायझरचा वापर केला जातो. यात 70 टक्के अल्कोहोल असते. हे अल्कोहोल केवळ आरोग्याच्या रक्षणासाठी आहे. त्याचे प्राशन करणे हे अतिशय धोकादायक आहे. ते पिणे योग्य नाही, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक भुजबळ यांनी केले.

Last Updated : Apr 27, 2021, 7:45 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details