महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

यवतमाळच्या कुलकर्णी दाम्पत्याकडे ५०० गणेश मूर्तींचा देखणा संग्रह; देशविदेशातील गणेश मूर्तींचा समावेश - गणेश प्रतिमा

कुलकर्णी या दाम्पत्याकडे थोड्याथोडक्या नव्हे तर चक्क 500 गणपती मूर्तींचा देखणा संग्रह आहे. अनिता कुलकर्णी यांच्या संग्रही देशविदेशातील गणेश मूर्तींचा समावेश असून हा छंद त्यांनी 1983 पासून जोपासला आहे.

यवतमाळच्या कुळकर्णी दाम्पत्याकडे ५०० गणेश मूर्तींचा देखणा संग्रह

By

Published : Sep 10, 2019, 9:04 PM IST

यवतमाळ - गणेशात्सव आला कि जिकडे-तिकडे, गणेश प्रतिमा स्थापन करण्यात येते. कुठे दीड दिवस, कुठे आठ दिवस, तर कुठे दहा दिवस हा सोहळा आणि त्याची धूम असते. दहा दिवसानंतर पुन्हा एकदा "गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या'' म्हणत गणरायाला निरोप दिला जातो असेच काहीसे वातावरण यवतमाळच्या डॉ. कुलकर्णीकडे देखील असते. मात्र, गणेशोत्सव बाराही महिने सुरू असणारे यवतमाळातील ते कदाचित एकमेव घर असावे. कुलकर्णी या दाम्पत्याकडे थोड्या-थोडक्या नव्हे तर चक्क 500 गणपती मूर्तींचा देखणा संग्रह आहे. या संग्रहातील प्रत्येक मूर्तीची जोपासना, देखभाल करणे हा अनिता कुलकर्णींचा छंदच नव्हे तर दिनक्रम झाला आहे.

यवतमाळच्या कुळकर्णी दाम्पत्याकडे ५०० गणेश मूर्तींचा देखणा संग्रह


पर्यटनाची आवड असणाऱ्या कुलकर्णींनी 1983 मध्ये चेन्नईतून एक पंचधातूंची गणेशमूर्ती आवडली म्हणून घेतली. त्यानंतर दुसऱ्या वर्षी त्यांना पुन्हा एका आगळ्यावेगळ्या सुवर्णरंगी दगडाची गणेश मूर्ती मिळाली. पुढच्या दोन-चार वर्षात आणखी चार-सहा मूर्तींची त्यात भर पडली. तर, पुढे गणेशाच्या सुंदर, रेखीव आणि वेगळ्या मूर्तींचा शोध घेण्याची अनितांना सवयच लागली.


संपूर्ण देशविदेशात भ्रमण केलेल्या अनिता यांच्याकडे आज 500 गणेश मूर्तींचा आगळा-वेगळा संग्रह तयार झाला आहे. या संग्रहात पंचधातू, तांबे, पितळ, स्फटिक, दगड, माती, काच, सिरॅमिक, चिनीमाती, फायबर अशा विविध प्रकार, आकार, रंग, रूपांच्या मूर्ती आहेत. तसेत बारा-पंधरा विविध रंग व प्रकारांचे दगड वापरलेल्या मूर्ती देखील आहेत. सोबतच दोन सेमी पासून दीड फूट उंचीच्या शंभराहुन अधिक मूर्ती एकाच दृष्टिक्षेपात सहजपणे पाहता येण्याचे वैशिष्ट्यही या रचनेत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details