महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

तळीरामांची देशी दारुनं कोजागिरी साजरी; रस्त्यावरील बाटल्या लुटण्यासाठी राडा

मारेगाव तालुक्यातील मार्डीमध्ये एक दारु तस्कर अवैधपणे देशी दारुची तस्करी करत होता. त्यावेळी तो गाडीवरून जाताना त्याला पोलिसांनी हात केला. तेव्हा तस्कराने घाबरुन गाडी तेथेच टाकून पळ काढला.

तळीरामांची देशी दारुनं कोजागिरी साजरी

By

Published : Oct 14, 2019, 3:13 PM IST

यवतमाळ- मारेगाव तालुक्यातील मार्डीमध्ये तळीरामांनी दूध पिऊन नाही, तर चक्क देशी दारू पिऊन कोजागिरी साजरी केली. त्याच झाल असं की, एक दारू तस्कर आपल्या गाडीच्या डिकीत अवैधपणे देशी दारू घेऊन जात होता. त्यावेळी पोलिसांनी गाडीला हात दाखवताच त्याने गोडी तेथेच टाकून पळ काढला. त्यावेळी 'जितना लूट सके, उतना लूट लो', असे म्हणत तळीरामांनी रस्त्यावर पडलेल्या दारूंच्या बाटल्या लुटल्या.

तळीरामांची देशी दारुनं कोजागिरी साजरी

हेही वाचा - राहुल गांधी प्रचारासाठी जिथे जातात तिथे त्यांचा उमेदवार पराभूत होतो - योगी आदित्यनाथ

याबाबत अधिक माहिती अशी, की मारेगाव तालुक्यातील मार्डीमध्ये एक दारु तस्कर अवैधपणे देशी दारुची तस्करी करत होता. त्यावेळी तो गाडीवरून जाताना त्याला पोलिसांनी हात केला. तेव्हा तस्कराने घाबरुन गाडी तेथेच टाकून पळ काढला. गाडी स्लिप झाल्याने डिकीतील दारूच्या बाटल्या खाली पडल्या. मग काय तळीरामांना जेवढ्या खिशात मावतील तेवढ्या बाटल्या घेऊन तेथून पळ काढला. त्यामुळे तळीरामांची कोजागिरी जोरात साजरी झाली.

ABOUT THE AUTHOR

...view details