'या' गावात पाणीटंचाईमुळे होईनात तरुणांचे लग्न, गावकऱ्यांचा मतदानावर बहिष्कार
नेर परसोपंत तालुक्याच्या आजंती गावामध्ये मागील ५० वर्षांपासून पाणी टंचाई आहे. या गावातील नागरिकांनी पाण्यासाठी अनेकदा आंदोलने करत निवेदने दिली.
यवतमाळ - वाशीम लोकसभा मतदारसंघातील नेर परसोपंत तालुक्याच्या आजंती गावामध्ये मागील ५० वर्षांपासून पाणी टंचाई आहे. या गावातील नागरिकांनी पाण्यासाठी अनेकदा आंदोलने करत निवेदने दिली. मात्र, प्रशासनाने याची दखल घेतली नाही. त्यामुळे या गावातील १८९९ मतदारापैकी फक्त ९३ मतदारांनी लोकसभेसाठी मतदान केले. तर राहिलेल्या ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकला. गंभीर बाब म्हणजे या गावात इतकी पाणी टंचाई आहे की, पाणी टंचाईमुळे गावात विवाहसुद्धा होत नसल्याचे गावकऱ्याचे म्हणणे आहे.