महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

यवतमाळ: महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियनचे लाक्षणिक उपोषण - agitation

आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी संयुक्त समन्वय कृती समितीच्यावतीने यवतमाळ जिल्हा परिषदेसमोर लाक्षणिक उपोषण करण्यात आले.

महाराष्ट्र राज्य जिल्हापरिषद कर्मचारी युनियनचे लाक्षणिक उपोषण करण्यात आले

By

Published : Aug 14, 2019, 1:03 PM IST

यवतमाळ - जिल्हा परिषद अंतर्गत काम करणाऱ्या विविध संवर्गाच्या राज्य पातळीवर अनेक महिन्यांपासून प्रलंबित मागण्या आहेत. या मागण्यांसाठी ९ ऑगस्ट क्रांतीदिनी संयुक्त समन्वय कृती समितीच्यावतीने यवतमाळ जिल्हापरिषदेसमोर लाक्षणिक उपोषण करण्यात आले.

कर्मचाऱ्यांच्या मागण्या

  • लिपीक, लेखा, परिचर, वाहन चालक, आरोग्य कर्मचारी व अनेक संवर्गाची पुर्वलक्षीत प्रभावाने म्हणजे किमान १ डिसेंबर २०१५ पासून ग्रेड पेमध्ये सुधारणा करण्यात यावी
  • समान वेतन समान ताण या तत्वानुसार समान फायदे हे तत्व लागू करुन नोव्हेंबर २००५ ला नेमणुका दिलेल्या सर्व संवर्गातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागु करावी
  • वर्ग ३ व वर्ग ४ कर्मचाऱ्यांना देखील त्यांच्या निवृत्तीनंतर झालेल्या विधानानंतर त्यांच्या कुटुंबाला निवृत्ती वेतन देताना आमदार महोदयांप्रमाणेच ते देण्यात यावे
  • शासनाने आतापर्यंत वेगवेगळ्या योजना राबविण्यासाठी या कर्मचाऱ्यांच्या मानधनावर कराराने कंत्राटी पद्धतीने नेमणुका केलेल्या आहेत. त्या सर्व संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या नेमणुका त्यांच्या प्रथम दिनांकापासून नियमित कराव्यात व भविष्यामध्ये अशा प्रकारचे निवडणुका करण्याचे धोरण रद्द करावे.

वरील मागण्यांसह विविध 22 मागण्यांसाठी हे लाक्षणिक उपोषण करण्यात आले. यावेळी संघटनेचे हरीभाऊ राऊत, संजय गावंडे, अशोक जयसिंगपुरे यांच्यासह महिला व इतर कर्मचारी उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details