महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नायब तहसीलदारांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ सामूहिक रजा आंदोलन

जिल्ह्यातील उमरखेडमध्ये वाळू माफियाकडून नायब तहसीलदार वैभव पवार यांच्यावर चाकू हल्ला करण्यात आला होता. या घटनेत पवार हे गंभीर जखमी झाले होते. दरम्यान अद्यापही या घटनेतील मुख्य आरोपीला अटक करण्यात आलेली नाही. याच्या निषेधार्थ आज राज्यातील सहाशे तहसीलदार आणि अडीच हजार नायब तहसीलदारांनी सामूहिक रजा आंदोलन केले.

By

Published : Feb 2, 2021, 8:24 PM IST

Updated : Feb 2, 2021, 9:39 PM IST

नायब तहसीलदारांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ सामूहिक रजा आंदोलन
नायब तहसीलदारांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ सामूहिक रजा आंदोलन

यवतमाळ -जिल्ह्यातील उमरखेडमध्ये वाळू माफियाकडून नायब तहसीलदार वैभव पवार यांच्यावर चाकू हल्ला करण्यात आला होता. या घटनेत पवार हे गंभीर जखमी झाले होते. दरम्यान अद्यापही या घटनेतील मुख्य आरोपीला अटक करण्यात आलेली नाही. याच्या निषेधार्थ आज राज्यातील सहाशे तहसीलदार आणि अडीच हजार नायब तहसीलदारांनी सामूहिक रजा आंदोलन केले. यावेळी जिल्ह्यातील महसूल कर्मचाऱ्यांच्या वतीने जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांना मागण्याचे निवेदन देऊन, जोपर्यंत आरोपीला अटक होणार नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे सांगण्यात आले.

नायब तहसीलदारांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ सामूहिक रजा आंदोलन

23 जानेवारीला झाला होता हल्ला

उमरखेड येथील गोपिकाबाई गावंडे महाविद्यालयासमोर 23 जानेवारीला रात्रीच्या सुमारास कुख्यात गुंड अविनाश चव्हाण याने अनधिकृत गौण खनिज वाहतुकीस प्रतिबंधक कारवाईसाठी गेलेल्या नायब तहसीलदार वैभव पवार आणि तलाठी गजानन सुरोसे यांच्यावर चाकू हल्ला केला होता. या हल्ल्यामध्ये ते गंभीर जखमी झाले आहे. 26 जानेवारीपर्यंत आरोपीला पकडण्यात येईल असे अश्वास पोलिसांनी दिले होते. मात्र, अद्यापही आरोपीस अटक न झाल्याने आज राज्यभरातील महसूल कर्मचाऱ्यांकडून आंदोलन करण्यात आले.

Last Updated : Feb 2, 2021, 9:39 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details