यवतमाळ - राज्याचे महसूल मंत्री आणि दिग्रस विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे उमेदवार संजय राठोड यांनी भाजपचे बंडखोर संजय देशमुख यांचा 63 हजार 607 मतांनी पराभव केला. त्यानंतर कार्यकर्त्यांनी दिग्रस इथं राठोड यांची जंगी विजयी रॅली काढली. रॅलीत फटाके फोडून आणि गुलाल उधळून जोरदार आनंद व्यक्त केल्या गेला. मात्र, ही रॅली शहरातील शिवाजी चौकात पोहोचल्या नंतर कार्यकर्त्यांना संजय राठोड यांचे वेगळेच रूप पाहायला मिळाले.
संजय राठोड यांच्या अंगात संंचारले उदयनराजे - यवतमाळ राजकीय बातमी
यवतमाळमध्ये राज्याचे महसूल मंत्री दिग्रस विधानसभा मदार संघातून विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला. त्यानंतर काढण्यात आलेल्या रॅलीत विजयी मिरवणुकीत वेगळेच रूप पाहायला मिळाले.
संजय राठोड यांची रॅली
संजय राठोड गाडीवर उभे झाले आणि आपल्या प्रतिस्पर्धीच्या कार्यकर्त्याकडे पाहून गाण्यावर चांगलाच ठेका देत होते. ते एवढ्यावरच थांबले नाही तर मिशावर ताव देत कॉलर उडवत होते तसेच पैलवाणासारखे दंड थोपटत विरोधकांना आव्हानच देत होते. त्यांची ही वेगळीच स्टाईल पाहून कार्यकर्तेना उदयनराजे भोसलेची आठवण झाली. राठोड यांच्या अंगात उदयनराजेंचा संचार झाला, अशी लोकांमध्ये चर्चा रंगली. शिवसेनेचे संजय राठोड हे चौथ्यांदा विजयी झाले आहे.