यवतमाळ -अपहरण करून बहिणीच्या मैत्रिणीवर अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी आरोपी अक्षय शरद बघमारे उर्फ बागा(25, रा. जामनकरनगर) असे या नराधम युवकाचे नाव आहे. याप्रकरणी अवधूतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय आहे घटना?
आरोपी अक्षयची बहीण व पीडिता या मैत्रिणी असून नेहमीच घरी येणे-जाणे आरोपीचे होते. पीडितांच्या आईचा कॅन्सरने मृत्यू झाला. त्यामुळे वडील व पीडित असे दोघेच घरी रहात होते. त्याचाच फायदा घेऊन आरोपी अक्षयने तिला वडिलांना ठार करण्याची धमकी देऊन तिच्यावर दोन तीन वेळा बळजबरी केली होती. पहाटे दोनच्या सुमारास आरोपी अक्षय तिच्या घरी दारूच्या नशेत आला. तिला मारहाण करीत बेशुद्ध केले. अनोळखी ठिकाणी नेऊन अत्याचार केला. यावेळी तिला जबर मारहाण करण्यात आली. त्यानंतर घरी आणून सोडून दिले. सकाळी ड्युटीवरून आल्यानंतर पीडितेच्या वडिलांना हा प्रकार लक्षात आला. यानंतर वडिलांनी अवधुत वाडी पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली.
हेही वाचा -पुणे : महिला लेफ्टनंट कर्नलच्या आत्महत्येचे कारण आले समोर....; ब्रिगेडियरविरुद्ध गुन्हा दाखल
सध्या पीडितावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. दत्तवाडी पोलिसांनी पिडीतेच्या बयाना वरून शरद बघणारे उर्फ बागा याच्यावरती विविध गुन्हे कलमा अंतर्गत गुन्हा दाखल केला. आरोपी फरार असून त्याचा शोध घेणे सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक मनोज केदारे यांनी दिली. दरम्यान, आरोपीवर अल्पवयीन असतानापासुनच गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत. यवतमाळातील अक्षय राठोड टोळीचा तो सतत संपर्कात असल्याची ही माहिती पोलिसांनी दिली.