यवतमाळ - करोना संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी राज्य शासनासह प्रशासन प्रयत्नशील असताना बेजबाबदार नागरिक या प्रयत्नांवर पाणी फेरत आहेत. जिल्ह्यातील घाटंजी येथे असाच एक संतापजनक प्रकार घडला. येथील आयटीआय कॉलेजमध्ये असलेल्या कोविड केअर सेंटरमधून तब्बल २० करोनाबाधितांनी पलायन केले. पलायन केलेल्या लोकांचे समुपदेशन करून त्यांना कोविड सेंटरमध्ये पुन्हा वापस आणण्यात प्रशासनाला यश आले आहे.
माहिती देताना घाटंजी तालुक्याचे आरोग्य अधिकारी डॉ. धर्मेश चव्हाण हेही वाचा -नेर तालुक्यातील मांगलादेवी येथे दोन दुकाने जळून खाक
कोरोना सेंटरवर पोलीस बंदोबस्त
या सर्व रुग्णांना घरी राहून जिवावर कसे बेतू शकते, हे समजावून देण्यात वैद्यकीय अधिकाऱ्यांना यश आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी या रुग्णांना पुन्हा कोविड सेंटरमध्ये दाखल केले. आता त्यांच्यावर नियमित उपचार करण्यात येत आहे. कोरोना सेंटरवर आता पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.
रुग्णांना सौम्य लक्षणे
कोरोना सेंटरमधून पळून गेलेले हे रुग्ण आमडी नावाच्या एका गावातील आहे. या सर्वांना कोरोनाची सौम्य लक्षणे होती. या कारणामुळे त्यांना घाटंजीच्या कोरोना सेंटरमध्ये भरती करण्यात आले होते. लक्षणे सौम्य असल्याने या रुग्नांना फारसा त्रास नव्हता. प्रशासन कोरोनाचे कारण समोर करीत आपल्याला उगीच डांबून ठेवत असल्याची भावना या रुग्णांमध्ये होती. याच कारणाने या रुग्णांनी कोरोना सेंटरमधून पलायन केले. अखेर प्रशासनाने या रुग्णांची समजूत काढल्यावर ते सर्व पुन्हा वापस आले. यानंतर प्रशासनाने सुटकेचा निश्वास टाकला.
हेही वाचा -एकाच दिवशी 45 मृत्यू; जिल्ह्यात 1323 जण पॉझिटिव्ह