महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जिल्ह्यात 21 लाख 75 हजार मतदार बजावणार मतदानाचा हक्क; प्रशासन सज्ज - निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज

यवतमाळ जिल्ह्यामध्ये वनी, राळेगाव, पुसद, उमरखेड, दिग्रस, यवतमाळ व आर्णी असे 7 विधानसभा मतदारसंघ आहेत. प्रत्येक मतदारसंघावर 15 प्रकारच्या सुविधा मतदारांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज

By

Published : Oct 20, 2019, 2:15 PM IST

यवतमाळ- जिल्ह्यात 21 ऑक्टोबरला विधानसभा निवडणूकीसाठी मतदान होणार नाही. 7 मतदारसंघासाठी 21 लाख 75 हजार मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे. यासाठी प्रशासन सज्ज झाले असून 15 हजार कर्मचाऱ्यांचा फौजफाटा 7 मतदारसंघातील 2 हजार 499 या मतदान केंद्रावर राहणार आहे.

निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज

यवतमाळ जिल्ह्यामध्ये वनी, राळेगाव, पुसद, उमरखेड, दिग्रस, यवतमाळ व आर्णी असे 7 विधानसभा मतदारसंघ आहेत. प्रत्येक मतदारसंघावर 15 प्रकारच्या सुविधा मतदारांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यामध्ये पाणी, शौचालय, रॅम्प, प्रथमोपचार पेटी, पाळणाघर, दिव्यांगासाठी व्हीलचेअर उपलब्ध असणार आहेत. दृष्टिहीन मतदारांसाठी ब्रेल लिपीत वोटर स्लिप उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

हेही वाचा - लोकशाहीचे खरे शत्रू हे भाजप-शिवसेना - प्रा. वसंत पुरके

निवडणूक विभागाकडे 56 संवेदनशील मतदान केंद्राची नोंद करण्यात आली आहे. या मतदान प्रक्रियेसाठी 10 हजार 993 कर्मचारी तर साडेचार हजार पोलीस कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणूक विभागाच्या आतापर्यंत पथकाने 12 ठिकाणी तपासणी करून 1 कोटी 32 लाखांची रोकड जप्त केली आहे. तर 42 लाख रुपयांचा अवैध दारूसाठाही जप्त करण्यात आला आहे. आचारसंहिता भंगाचे 8 गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

हेही वाचा - विद्यमान आमदारांचे कारनामे उघड; काँग्रेसचे उमेदवार मांगुलकर यांचा आरोप

तसेच 250 मतदान केंद्रातून मतदानाचे वेब कास्टिंग करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी पत्रकार परिषदेत दिली. तर जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी 7 विधानसभा मतदारसंघांमध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी, 24 पोलीस निरीक्षक, 83 पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक, 1 हजार 737 पोलीस कर्मचारी, 1 हजार 101 होमगार्ड यासह 4 हजार 460 पोलिसांचा तगडा बंदोबस्त असणार आहे. तेलंगणातील 600 होमगार्ड यावेळी प्रथमच जिल्ह्यात बोलवण्यात आल्याचीही माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.

ABOUT THE AUTHOR

...view details