महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अभिनेता अल्लू अर्जुन पर्यटनासाठी टिपेश्वर अभयारण्यात - अल्लू अर्जुन टिपेश्वर अभयारण्य भेट

दक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुन हा पर्यटनासाठी यवतमाळमधील टिपेश्वर अभयारण्यात आला होता. पर्यटन केल्यानंतर तो पुन्हा तेलंगणासाठी रवाना झाला. त्याला पाहण्यासाठी चाहत्यांनी गर्दी केली होती.

Allu Arjun
अल्लू अर्जुन

By

Published : Sep 13, 2020, 4:41 PM IST

यवतमाळ - दक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुन याने आज यवतमाळ जिल्ह्यातील व्याघ्र प्रकल्प असलेल्या टिपेश्वर अभयारण्याला भेट दिली. नागरिकांना याची माहिती मिळताच त्याची एक झलक पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. आज सकाळी 6 वाजता अर्जुनने अभयारण्याच्या सुन्ना गेटवरून प्रवेश केला. 10 वाजेपर्यंत त्याने या अभयारण्यामध्ये पर्यटन केले.

अल्लू अर्जुन पर्यटनासाठी टिपेश्वर अभयारण्यात

कोरोनामुळे टिपेश्‍वर व्याघ्र प्रकल्पात ऑनलाइन नोंदणी बंद आहे. त्यामुळे ऑफलाइन नोंदणी करूनच अर्जुनने व्याघ्र दर्शनासाठी प्रवेश केला. अर्जुनने चाहत्यांना एकदा अभिवादनकरून तेलंगाणासाठीचा पुढचा प्रवास सुरू केला.

ABOUT THE AUTHOR

...view details