यवतमाळ - वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसेच जिल्ह्यातील विविध संस्थात्मक विलगीकरण कक्षात भरती असलेल्या 41 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. यात महागाव येथील 18, सर्जरी विभागातील आठ, आर्णी येथील सहा, आर्थो विभागातील चार, पुसद येथील दोन तर तळेगाव, नेर आणि यवतमाळ ग्रामीण येथील प्रत्येकी एक रिपोर्टचा समावेश आहे. वैद्यकीय महाविद्यालयाने तपासणीकरता एकूण 75 नमुने प्रयोगशाळेत पाठविले होते. यापैकी 41 रिपोर्ट प्राप्त तर उर्वरीत 34 अप्राप्त आहेत. सर्व अप्राप्त नमुने हे महागाव येथील आहे.
यवतमाळमधील 41 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह; आयसोलेशन वॉर्डात 33 ॲक्टिव्ह पेशंट
आयसोलेशन वॉर्डात सद्यस्थितीत 33 ॲक्टिव्ह पॉझिटिव्हसह 38 जण भरती असून यात पाच केसेस प्रिझमटिव्ह आहे. जिल्ह्यात आतापर्यंत पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 157 वर गेली आहे. यापैकी 122 जणांना सुट्टी देण्यात आली आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत 33 ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. तर दोन कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्युची नोंद झाली आहे.
आयसोलेशन वॉर्डात सद्यस्थितीत 33 ॲक्टिव्ह पॉझिटिव्हसह 38 जण भरती असून यात पाच केसेस प्रिझमटिव्ह आहे. जिल्ह्यात आतापर्यंत पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 157 वर गेली आहे. यापैकी 122 जणांना सुट्टी देण्यात आली आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत 33 ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. तर दोन कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्युची नोंद झाली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने आतापर्यंत 2439 नमुने तपासणीकरता पाठविले. यापैकी 2405 नमुन्यांचे रिपोर्ट प्राप्त झाले. 34 रिपोर्ट अप्राप्त आहेत. सुरवातीपासून आतापर्यंत 2248 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. संस्थात्मक विलगीकरणात 16 तर गृह विलगीकरणात 337 जण असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले आहे.