यवतमाळ -पूजा चव्हाण या तरुणीने पुणे येथे आत्महत्या केल्याप्रकरणी शिवसेनेचे नेते तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांचे नाव समोर येत आहे. सोशल मीडियातून ऑडियो क्लिप व्हायरल होत आहे. या क्लिपमध्ये मंत्री संजय राठोड यांचा आवाज असल्याचे जिल्ह्यातील नव्हे तर विदर्भातील जनता ओळखू शकते. त्यामुळे या प्रकरणात व्यक्ती कुणीही असो, कितीही मोठी व्यक्ती असो इतकेच काय तर मंत्री असो, मुख्यमंत्री असो वा राज्यपाल असो, गुन्हा असेल तर कायद्यानुसार कारवाई झालीच पाहिजे. नाहीतर रस्त्यावर उतरून आंदोलन उभारू, असा इशारा बंजारा समाजाचे नेते तथा माजी सभापती मनमोहनसिंह चव्हाण यांनी दिला आहे.
आरोपी नसेल तर संजय राठोड यांना मुख्यमंत्र्यांनी क्लिनचीट द्यावी
मंत्री संजय राठोड यांचे नाव पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी जोडले जात आहे. या प्रकरणात लवकरात लवकर मुख्यमंत्री यांनी निपक्षपाती चौकशी करावी. संजय राठोड़ यांना बडतर्फ करावे आणि नंतरच चौकशी करावी आणि गुन्हा दाखल करावा. दोषी नसेल तर मुख्यमंत्री यांनी क्लिनचीट द्यावी, अशीही मागणी करण्यात येत आहे.