यवतमाळ -आर्थिक बाजारपेठ आणि कारखान्याच्या प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत असलेले मुकुटबन शहरातील मुख्य मार्ग जेवढे सोईचे आहे तेवढे घातक ठरत आहे. यात आज (बुधवारी) गुरुकुल शाळेजवळ एका अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिली. या धडकेत (एमएच 34 एझेड 2378) दुचाकीवरील एक युवकाचा जागीच मृत्यू झाला. तर दुसरा गंभीर जखमी झाला असून, त्याला उपचारासाठी रुग्णवाहिकेने वणी येथे दाखल करण्यात आले आहे.
हेही वाचा - बुरख्यात कॅमेरा लपवून 'ही' तरुणी पोहचली शाहीन बागेत