यवतमाळ - जिल्ह्यातील पुसद तालुक्याला काल अचानक आलेल्या अवकाळी पावसासह गारपिटीचा तडाखा बसला आहे. यामुळे पिकांचे तसेच पालेभाज्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आंबा या पिकाचे जास्त नुकसान झाले आहे. पावसामुळे नागरिकांना उकड्यापासून सुटका झाली आहे. १५ दिवसापासून तापमानाचा पारा ४० ते ४२ अंशावर पोहचला होता.
यवतमाळमध्ये अवकाळी पावसाची हजेरी; पिकांचे नुकसान - FRUITS
पुसद शहरासह संपुर्ण तालुक्यातील ग्रामीण भागाला अवकाळी पावसासह गारपिटीचा चांगलाच तडाखा बसला. अचानक ढगाळी वातावरण होऊन पावसाच्या सरी कोसळू लागल्या.
पुसद शहरासह संपुर्ण तालुक्यातील ग्रामीण भागाला अवकाळी पावसासह गारपिटीचा चांगलाच तडाखा बसला. अचानक ढगाळी वातावरण होऊन पावसाच्या सरी कोसळू लागल्या. त्यानंतर काही वेळातच गाराही पडू लागल्या. सुमारे पंधरा मिनिट पडलेल्या गारांनी काहीकाळ जनजीवन विस्कळित करून टाकले होते. मागील ३ ते ४ दिवसापासून जिल्ह्यात ढगाळी वातावरण निर्माण झाले होते. काल यवतमाळ येथेही पावसाने हजेरी लावली होती. तसेच मारेगाव, वणी यासह इतरही तालुक्यात पावसाने हजेरी लावली. या अवकाळी पावसाने आंबा, व पालेभाज्या या पिकांचे काही प्रमाणात नुकसान झाले.