महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

यवतमाळमध्ये मुलांमधून अभयकुमार बाफना, तर मुलींमध्ये आरोही अमीन अव्वल

गेल्या फेब्रुवारी महिन्यात जिल्ह्यातील १०९ परीक्षा केंद्रावरून ३० हजार ५७८ विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. त्यापैकी २६ हजार ५११ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे.

By

Published : May 29, 2019, 8:25 AM IST

उत्तीर्ण झालेले विद्यार्थी

यवतमाळ - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने नुकताच बारावीचा निकाल जाहीर केला आहे. यामध्ये जिल्ह्यात विज्ञान शाखेमध्ये अभयकुमार आशीषकुमार बाफणा ९४.७७ टक्के घेऊन प्रथम आलेला आहे, तर आरोही अनिल अमीन ९३.५३ टक्के घेऊन मुलींमध्ये प्रथम आलेली आहे.

यंदा बारावीच्या निकालात राज्यामध्ये मुलांपेक्षा मुलींनी बाजी मारली आहे. गेल्या फेब्रुवारी महिन्यात जिल्ह्यातील १०९ परीक्षा केंद्रावरून ३० हजार ५७८ विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. त्यापैकी २६ हजार ५११ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. निकालाचा टक्केवारी ८६.७३ टक्के आहे. विशेष म्हणजे १ हजार ३८२ विद्यार्थ्यांनी प्राविण्य श्रेणी मिळवली आहे, तर १० हजार ५०५ विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी पटकवली आहे. प्रथम आलेल्या अभयकुमारला ६५० पैकी ६१६ गुण मिळाले आहेत, तर आरोहीला ६०८ गुण मिळाले आहे. यासोबतच श्रावणी मदन देशमुख ९१.६९ टक्के गूण घेऊन तिसरी आली आहे.

तालुकानिहाय टक्केवारी -

  1. जिल्ह्यात महागाव तालुक्याचा सर्वाधिक ९२.३० टक्के निकाल लागला. तर वणी तालुक्याचा निकाल सर्वात कमी ७२.३३ टक्के आहे.
  2. उमरखेड - ९१.३२
  3. नेर - ९१
  4. आर्णी - ९०.६८
  5. पांढरकवडा - ९०.३१
  6. झरी - ८८.५६
  7. दिग्रस ८८.५२
  8. कळंब - ८७.६५
  9. पुसद ८७.४३
  10. यवतमाळ ८७.२३
  11. दारव्हा - ८७.२०
  12. घाटंजी ८६.९१
  13. बाभूळगाव - ८२
  14. मारेगाव - ७६.८१
  15. राळेगाव - ७५.४४

तालुकानिहाय उत्तीर्ण झालेले विद्यार्थी -

  1. यवतमाळ तालुका - येथून २ हजार ३४५ विद्यार्थी आणि २ हजार ३७४ विद्यार्थिनी असे एकूण ४ हजार ७१९ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्ज भरले. त्यापैकी ४ हजार ७१७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी १ हजार ९५९ मुले आणि २ हजार १६१ मुली असे एकूण ४ हजार १२० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. तालुक्याची निकालाची टक्केवारी ८७.३४ टक्के आहे.
  2. नेर - तालुक्यात १ हजार २७१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यात ५७० मुले आणि ५८७ मुली असे एकूण १ हजार १५७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
  3. दारव्हा - तालुक्यात ९८२ मुले आणि ९०५ मुली असे एकूण १ हजार ८८७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
  4. दिग्रस - तालुक्‍यात १ हजार ७९० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यात ८३३ मुले आणि ७१२ मुलींचा समावेश आहे. त्यापैकी १ हजार ५८५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
  5. आर्णी - तालुक्यात ८५० विद्यार्थी आणि ६६६ विद्यार्थिनी असे एकूण १ हजार ६१६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
  6. पुसद - तालुक्यात ३ हजार ९९० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी २ हजार ४४ मुले आणि १ हजार ६४३ मुली असे एकूण ३ हजार ४८७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
  7. उमरखेड - तालुक्यात २ हजार ४८३ विद्यार्थ्यांपैकी १ हजार २१३ मुले आणि १ हजार ५२ मुली असे एकूण २ हजार २६५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
  8. महागाव - तालुक्‍यात २ हजार ३१६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. १ हजार १७७ मुले आणि ९६१ मुली असे एकूण २ हजार १३७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
  9. बाबुळगाव - तालुक्यात १०२६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी ४९० मुले आणि ३५५ मुली असे एकूण ८४५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
  10. कळंब - तालुक्यात १ हजार १९७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यात ४९३ मुले आणि ५५७ मुली असे एकूण १ हजार ५० विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
  11. राळेगाव - तालुक्यात १ हजार २८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी ७७६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
  12. मारेगाव - तालुक्यात ८९४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी ६७९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
  13. पांढरकवडा - तालुक्यात १ हजार ५४० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी १ हजार ३९२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
  14. झरी जामणी - तालुक्यात ७३० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी ६४७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
  15. वणी - तालुक्यात २ हजार ८७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी एकूण १ हजार ५१० विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
  16. घाटंजी - तालुक्यात १ हजार ७५८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी १ हजार ५२९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

ABOUT THE AUTHOR

...view details