महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पाणीप्रश्नासाठी ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार, 'या' गावात फक्त ५० लोकांनी केले मतदान - boycott

यवतमाळ जिल्ह्यातील नेर तालुक्यातील आजनती आजंती गावामध्ये लोकांनी मतदानावर बहिष्कार टाकत फक्त ५० लोकांनी या गावात मतदान केले आहे.

पाणीप्रश्नासाठी ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार

By

Published : Apr 11, 2019, 7:38 PM IST

यवतमाळ - निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यामध्ये विदर्भातील ७ जागांसह देशातील विविध ठिकाणी मतदान होत आहे. सकाळपासूनच मतदान केंद्रांवर लोकांची रीघ लागायला सुरुवात झाली आहे. मात्र, यवतमाळ जिल्ह्यातील नेर तालुक्यातील आजनती आजंती गावामध्ये लोकांनी मतदानावर बहिष्कार टाकत फक्त ५० लोकांनी या गावात मतदान केले आहे.

पाणीप्रश्नासाठी ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार

या गावातील नागरिकांनी पाण्याच्या प्रश्नासाठी लोकसभा निवडणूक मतदानावर बहिष्कार टाकला आहे. या गावात १ हजार ९०० मतदान असून येथील फक्त ५० लोकांनीच मतदान केले आहे. या गावात सगळीकडे सकाळपासून शुक-शुकाट पहायला मिळाला.

ABOUT THE AUTHOR

...view details