दारू नव्हे तर दूध पिऊन नववर्षाची सुरुवात; प्रहार पक्षाचा अनोखा उपक्रम
नववर्षाचे स्वागत दारू पिऊन धिंगाणा घालण्याऐवजी दूध पिऊन नववर्षाचे स्वागत केले पाहिजे. म्हणूनच प्रहारच्या वतीने आर्णी रोडवरील वडगाव नाक्याच्या चहुबाजूने वाईन शॉप आणि बार यांची दुकाने असून त्यांच्या मधोमध युवकांना दूध वाटप करण्यात आले.
दारू नव्हे तर दूध पिऊन नववर्षाची सुरुवात
यवतमाळ- नवीन वर्षाची सुरुवात दारू पिऊन धिंगाणा घालण्याऐवजी दूध पिऊन करा. कोरोनाच्या काळात दूध पिऊन तंदुरस्त रहा, असा संदेश प्रहार जनता पक्षाच्यावतीने देण्यात आला. यावेळी आर्णी रोडवरील वडगाव नाक्यावर रात्री बारा वाजताच्या सुमारास प्रहार पक्षाच्यावतीने युवकांना दुधाचे वाटप करण्यात आले. दूध पिणे किती लाभदायक आहे हे सांगण्याचा प्रयत्न प्रहार पक्षाच्यावतीने करण्यात आला.