यवतमाळ- शहर पोलिसांनी कार चोरी करणाऱ्या चोरट्यांना जेरबंद करण्यात यश आले आहे. काही दिवसांपूर्वी संदिप टॉकीज परिसरातून फोर्ड कंपनीची कार चोरीस गेली होती. त्यानंतर शहर पोलिसांनी चोरट्यांचा माग काढला व त्यांना जेरबंद केले.
यवतमाळ शहर पोलिसांची कारवाई; महागडी कार चोरणाऱ्यास अटक - Sagar Bhusari Car Theft Case News
चंदन खरतडे (रा. तलाव फैल) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. हिंगणघाट येथील सागर भुसारी हे एका कार्यक्रमासाठी नातेवाईकाकडे आले होते. त्यांनी आपली फोर्ड कंपनीची कार क्र. (एमए.२९ आ-०७१२) संदिप टॉकीज परिसरात ठेवली होती. मात्र, कार तेथून चोरीला गेली. याप्रकरणी गुण्हा नोंद झाल्या नंतर शहर पोलिसांनी कसून चोरट्यांचा शोध घेतला व एका चोरट्याला जेरबंद केले.

चंदन खरतडे (रा. तलाव फैल) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. हिंगणघाट येथील सागर भुसारी हे एका कार्यक्रमासाठी नातेवाईकांकडे आले होते. त्यांनी आपली फोर्ड कंपनीची कार क्र. (एम.ए.२९ आ.०७१२) संदिप टॉकीज परिसरात ठेवली होती. मात्र कार तेथून चोरीला गेली होती. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून पोलिसांकडून चोरट्यांचा कसून शोध घेतल्या जात होता. अखेर चोरट्यांची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून कारवाई कली व चोरट्याला अटक केली. सोबत चोरीस गेलेली कारही जप्त केली. या कारची किंमत ११ लाख ५० हजार रुपये एवढी आहे. सदर चोरट्याकडून पुन्हा काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
हेही वाचा-परतीच्या पावसाचा हाहाकार; चोवीस तासात दोन शेतकऱ्यांच्या आत्महत्या