यवतमाळ -युवकांच्या मनात राष्ट्रप्रेम जागृत करण्यासाठी 'प्रतिसाद फाऊंडेशन'तर्फे आज स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने 73 मीटर लांब तिरंग्यासोबत रॅली काढण्यात आली. सोबतच कोल्हापूर आणि सांगली या भागात आलेल्या महापुरामुळे अनेकांचे कुटुंब उद्धवस्त झाले, त्यांच्यासाठी मदतनिधी देखील गोळा करण्यात आला.
प्रतिसाद फाऊंडेशनतर्फे 73 मीटर लांबीच्या तिरंग्यासोबत भव्य रॅलीचे आयोजन... - independence day special
यवतमाळ शहरातील प्रमूख मार्गाने 73 मीटर लांबीच्या तिरंग्यासोबत ढोल पथकाच्या संगतीने भव्य रॅली काढण्यात आली. 73 मीटरचा ध्वज घेऊन चालण्यासाठी प्रतिसाद फाऊंडेशनचे 200 कार्यकर्ते ध्वज घेऊन पथसंचलन करीत होते. या अनोख्या उपक्रमाला पाहण्यासाठी यवतमाळकरांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
यवतमाळ शहरात 73 वा स्वातंत्र्य दिन अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. शहरातील प्रमुख मार्गाने 73 मीटर लांबीच्या तिरंग्यासोबत ढोल पथकाच्या संगतीने भव्य रॅली काढण्यात आली. 73 मीटरचा ध्वज घेऊन चालण्यासाठी प्रतिसाद फाऊंडेशनचे 200 कार्यकर्ते पथसंचलन करीत होते. या अनोख्या उपक्रमाला पाहण्यासाठी यवतमाळकरांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
शेतकरी आत्महत्या आणि गुन्हेगाराचे गाव म्हणून यवतमाळची ओळख होत चालली आहे. ही ओळख मिटविण्यासाठी तसेच यवतमाळच्या तरुण पिढीमध्ये राष्ट्रप्रेम, देशभक्ती जागृत करणे गरजेचे आहे. त्यासाठी हा उपक्रम प्रतिसाद फाऊंडेशनने राबविला असल्याचे प्रतिसादचे अध्यक्ष मनोज गुल्हाने, नगरसेविका नीता इसाळकर यांनी सांगितले आहे.