महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अपघातात हात गमावूनही 'ती' बनली सुंदर चित्रकार - mohini dagwar news

मोहिणीच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून यवतमाळ रोटरी क्लबने तिच्या चित्रांचे प्रदर्शन भरविले आहे. तिने काढलेले चित्र पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर रसिक भेट देत आहे.

अपघातात हात गमावूनही 'ती' बनली सुंदर चित्रकार
अपघातात हात गमावूनही 'ती' बनली सुंदर चित्रकार

By

Published : Feb 3, 2021, 8:00 AM IST

यवतमाळ-अवघ्या तीन वर्षांची असताना रेल्वेच्या डब्ब्यातून पडून अपघात तिने आपले हात गमावले. पण जर मनात जिद्द, चिकाटी आणि आकांक्षा असेल तर कोणीही आकाशाला गवसणी घालू शकतात. याचाच मूर्तिमंत उदाहरण म्हणजे यवतमाळची मोहिनी डगवार. अपघातात तिचे दोन्ही हात गेले पण मोहिनीची इच्छाशक्ती मात्र, डगमगली नाही. अपंगत्वार मात करत कॉम्पुटरमध्ये बीएससी पूर्ण केले. याशिवाय तिने सोबतच चित्रकलेचा छंद जोपासला. रोटरी क्लबच्यावतीने तिने काढलेल्या चित्रांचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. या प्रदर्शनाला यवतमाळकर उस्फुर्त प्रतिसाद देत आहे.

अपघातात हात गमावूनही 'ती' बनली सुंदर चित्रकार
छंदातून पेंटिंगची निर्मितीबालपणापासूनच मोहिनीला चित्रे रेखाटण्याचा छंद होता. चित्रे काढण्यासाठी तिने कुठलाच क्लास वा चित्रकलेची परीक्षा दिली नाही. मनात येईल तसे ती चित्र रेखाटू लागली. आज तिचा हा छंदच तिची वेगळी ओळख बनली आहे. आज ती कोणाचीही मदत न घेता अतिशय सुरेख चित्र काढते. तिच्या या सृजनशीलतेला बघून अनेकांना तिच्या कलाकृतीने मोहिनी घातली आहे.
अपघातात हात गमावूनही 'ती' बनली सुंदर चित्रकार
रोटरी क्लबने भरविले प्रदर्शनमोहिणीच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून यवतमाळ रोटरी क्लबने तिच्या चित्रांचे प्रदर्शन भरविले आहे. तिने काढलेले चित्र पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर रसिक भेट देत आहे. ज्या पद्धतीने आपल्या शाररिक उणीवांवर मात करून तिने चित्रकलेचा छंद जोपासला आहे. खरोखरच मोहिनीने समाजासमोर मोठा आदर्श ठेवला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details