यवतमाळ - पुसद दिग्रस रोडवरील पूस नदीच्या पुलावरून एका अल्पवयीन मुलीने उडी मारून आत्महत्या केली. काल दुपारी ही घटना घडली. प्रीती अजय जगदाळ वय पंधरा वर्षे असे आत्महत्या करणाऱ्या मुलीचे नाव आहे.
सकाळी मुलगी घरून निघून गेल्यानंतर आईने थेट शहर पोलीस स्टेशन गाठले. तिने मुलगी घरून निघून गेल्याची माहिती दिली. दरम्यान दुपारी दीड वाजता पुसद दिग्रस रोडवरील पूस नदीच्या पुलावरून मुलीने उडी मारून आत्महत्या केल्याची माहिती मिळाली. लगेच पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली. मुलीला वाचवण्यासाठी युवराज पुंडलिक जामनोर,अनिल जनार्दन वांजाळ, गणेश भिकाजी दिंडे, दादासाहेब कोडबा, राहुल विजय चव्हाण, शेख अफसर यांनी अथक परिश्रम घेतले. शेवटी मुलीचा मृतदेह शोधण्यात पोलिसांना यश आले.