महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Nov 8, 2019, 12:33 PM IST

ETV Bharat / state

उसने दिलेले पैसे परत मागितले म्हणून मित्राचा खून

करण कश्यप हा वणी येथील एका खासगी फायनन्स कंपनीत कामाला होता. जुगाराचा छंद जडल्याने त्याच्या डोक्यावर कर्जाचे ओझे वाढले होते. त्याने त्याच्याच कंपनीत काम करणार्‍या सतीश देवासेकडून उसनवारीने साठ हजार रुपये घेतले होते. पैशाच्या कारणावरून दोघांमध्ये वाद झाला. हा वाद विकोपाला जाऊन दोरीच्या साहाय्याने आरेपीने सतीशचा गळा आवळून खून केला. आरोपीला पोलिसांनी नागपुरातून अटक केली आहे.

मृत सतीश देवासे

यवतमाळ - उसने दिलेले पैसे परत मागत असल्याने मित्राला रूमवर बोलावून त्याचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना वणी शहरात उघडकीस आली. सतीश देवासे (वय 28, रा. तुकूम, जि.चंद्रपूर) असे मृताचे तर, करण कश्यप (वय 25, रा. आर्वी) असे मारेकर्‍याचे नाव आहे. आरोपीला पोलिसांनी नागपुरातून अटक केली आहे.

करण हा वणी येथील एका खासगी फायनन्स कंपनीत कामाला होता. जुगाराचा छंद जडल्याने त्याच्या डोक्यावर कर्जाचे ओझे वाढले होते. त्याने त्याच्याच कंपनीत काम करणार्‍या सतीश देवासेकडून उसनवारीने साठ हजार रुपये घेतले होते. सतीशने काही दिवसांपासून दिलेल्या पैशांसाठी तगादा लावला होता. करण पैसे देण्यासाठी टाळाटाळ करत असल्याने सतीश त्याच्या रवीनगर येथील खोलीवर गेलाला. पैशाच्या कारणावरून दोघांमध्ये वाद झाला. हा वाद विकोपाला जाऊन दोरीच्या साहाय्याने आरेपीने सतीशचा गळा आवळून खून केला. मृतदेह पोत्यात भरून त्याची विल्हेवाट लावण्याची योजना करणने आखली. मात्र, त्याला संधी मिळाली नाही. दोन दिवस मृतदेह खोलीतच राहिल्याने दुर्गंधी पसरण्यास सुरुवात झाली असता खोलीला कुलूप लावून करणने पोबारा केला. घरातून दुर्गंधी येत असल्याने घरमालक अनिल आसुटकर यांना संशय आला. त्यांनी तत्काळ वणी पोलिस ठाणे गाठून ठाणेदार वैभव जाधव यांना माहिती दिली. पोलिसांनी कुलूप तोडून आत प्रवेश केला असता, मृतदेह आढळून आला.

हेही वाचा - मुंबईत क्रेडिट कार्ड वसुली एजंटच्या जाचाला कंटाळून तरुणाची आत्महत्या

पोलिसांनी तत्काळ तपासाची सूत्रे हलवून करणच्या मोबाईलचे लोकेशन शोधले. तो नागपूरच्या दिशेने जात असल्याचे तपासात निष्पन्न झाले. काजीपुरा येथे संशयित करणचा मामा राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून नागपूर पोलिसांच्या मदतीने सापळा रचून रात्री करण त्याच्या मामाच्या घरी येताच पोलिसांनी त्याला अटक केली.ही कारवाई एसडीपीओ सुशीलकुमार नायक यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार वैभव जाधव, पीएसआय गोपाल जाधव, सुदर्शन वानोडे, शेखर वांढरे, सुनील खंडागळे, सुधीर पांडे, रत्नपाल मोहाडे अमित पोयाम, दीपक वांड्रसवार यांनी केली.

ABOUT THE AUTHOR

...view details