यवतमाळ - कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता शासनाने जिल्ह्यात लॉकडाऊन केले होते. तरीही नागरिक विनाकारण शहरात भटकट होते. अशा भटकणाऱ्या 24 हजार 799 प्रकरणात 50 लाखांचा दंड वाहतूक शाखेकडून वसूल करण्यात आला.
प्रत्येक चौकात केली कारवाई

सकाळी 7 ते 11 च्या दरम्यान अत्यावश्यक सेवेची दुकाने उघडण्यास मुभा होती. या व्यतिरिक्त सर्व दुकाने बंदचे आदेश होते. तरीही नियोजित वेळेनंतर पेट्रोल, औषध अशी कारणे सांगून दुचाकी घेऊन बाहेर पडणाऱ्यांची संख्या अधिक होती. प्रशासनाच्या आदेशाला झुगारून काही महाभाग विनाकारण वाहने घेऊन घराबाहेर पडल्याने पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली. संचारबंदी असूनही काही जण शहरात फिरत असल्याचे पाहून पोलिसांनी प्रत्येक चौकात गाडी अडवून कारवाईला सुरुवात केली.
कोरोना कमी होण्यास मदत
एक एप्रिल ते ३१ मे या काळात जिल्हा वाहतूक शाखेने यादरम्यान विनाकारण फिरणाऱ्यांवर एकुण २४ हजार ७९९ केसेस दाखल केल्या. त्यांच्याकडून तब्बल ५० लाख ४६ हजार ९०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. प्रशासनाच्या या सक्तीमुळे कोरोना रुग्णांची संख्या कमी होण्यास बरीच मदत झाली. याचाच काहीसा परिणाम म्हणावा लागेल, की पीक पिरेडमध्ये जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दीड हजारापर्यंत जात होती. तीच संख्या आता १०० पर्यंत येऊन पोहचली आहे.