महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

यवतमाळ जिल्ह्यात केंद्रीय पथकाकडून नुकसानग्रस्त भागाची केली पाहणी

गेल्या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकाच्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी आज केंद्रीय पथक आज यवतमाळ जिल्ह्यातील नेर तालुक्यात दाखल झाले. या पथकाने कापूस, सोयाबीन, तूर यासह इतर पिकांची पाहणी केली. यावेळी हातातोंडाशी आलेला घास हिरावून नेला असल्याने शासनाकडून मदत मिळावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली.

यवतमाळ जिल्ह्यात केंद्रीय पथकाने नुकसानग्रस्त भागाची केली पाहणी

By

Published : Nov 22, 2019, 7:33 PM IST

Updated : Nov 22, 2019, 8:31 PM IST

यवतमाळ- गेल्या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकाच्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी आज केंद्रीय पथक आज यवतमाळ जिल्ह्यातील नेर तालुक्यात दाखल झाले. या पथकाने कापूस, सोयाबीन, तूर यासह इतर पिकांची पाहणी केली. यावेळी हातातोंडाशी आलेला घास हिरावून नेला असल्याने शासनाकडून मदत मिळावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली.

यवतमाळमध्ये अतिवृष्टीमुळे पिकांचे झालेले नुकसान

राज्यात गेल्या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने यवतमाळ जिल्ह्यात मोठे नुकसान झाले. हातातोंडाशी आलेला घास शेतकऱ्यांचा हिरावून नेला. या अवकाळी पावसाने खरीपाचे पीक पूर्णपणे उध्वस्त झाले. या पिकाची पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारचे पथक आज यवतमाळ जिल्ह्यात दाखल झाले. नेर तालुक्यातील वटफळी, लोणी ,मोझर, घारेफळ या गावात सोयाबीन, कापूस, उडीद मूग, फळबागची पाहणी केली.

यवतमाळ जिल्ह्यात केंद्रीय पथकाने नुकसानग्रस्त भागाची केली पाहणी

या पथकात कापूस संशोधन केंद्र संचालक डॉ. आर पी सिंग, आयुक्त पियुष सिह, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी नेर तालुक्यातील वटफळी येथील शेतकरी राजेंद्र साखरकर यांच्या शेतातील नुकसानीची पाहणी केली. जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे ४ लाख ४० हजार शेतकऱ्यांना फटका बसला असून ५ लाख हेक्टर वर पिकाचा नुकसान जिल्ह्यात झाले आहे. सरकारने २५ हजार हेक्टरी मदत तातडीने करावी, अशी करण्यात आली.

यवतमाळ जिल्ह्यात केंद्रीय पथकाने नुकसानग्रस्त भागाची केली पाहणी
Last Updated : Nov 22, 2019, 8:31 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details