यवतमाळ - आपल्या प्रियजनांना अखेरचा निरोप देण्यासाठी हजारो लोकांचा सहभाग असलेल्या अंत्ययात्रा या स्मशानभूमीने पाहिल्या आहेत. मात्र आज कोणामुळे परिस्थिती बदलली. रक्ताचे आणि जवळचे नातेवाईकही मृतदेहाला स्पर्श करायला धजावत नाहीत, इतकेच काय तर मोक्षधामातही येण्यास टाळतात. अशा परिस्थितीत नागरपाकिलकेचे चार कर्मचारी हे मृतदेह मोक्षधाममध्ये ॲम्बुलन्समधून उतरवतात. तर धर्माने मुस्लीम असलेले अब्दुल जब्बार अब्दुल सत्तार आणि शेख अहेमद हे दोघे हिंदू विधिनुसार कोणतीही भीती न बाळगता अंत्यसंस्कार करतात.
संवेदना गोठवून टाकणारा क्षण-
मागच्या वर्षांपासून कोरोना काळात झालेल्या 923 मृदेहावर त्यांच्या धर्माच्या विधिनुसार अंत्यसंस्कार करण्याचे काम बजावणारे हे योद्धे आहेत. अब्दुल जब्बार अब्दुल सत्तार, शेख अहमद, शेख अलीम, आरिफ खान आयुष्यभर जात, धर्म करणारा माणूस जेव्हा कलेवर होऊन पडतो, तेव्हा त्यांच्या अंतिम प्रवासाला सहाय्य करणारे हात केवळ माणसाचेच असतात. कोरोनामुळे झालेला मृतकांचा अंतिम संस्कार हा संवेदना गोठवून टाकणारा क्षण आहे. परिस्थिती अशी आली आहे की, आपले सुद्धा मृतदेहाला हात लावू शकत नाही. अशा परिस्थितीत परिवार, कुटुंब, धर्म, समाज बाजूला ठेवून अत्यल्प मेहताण्यावर अंतिम संस्कार करण्यासाठी जीवाची बाजी लावणारे दुर्लक्षित कॉरोना यौद्धे म्हणजेच स्मशानभूमीतील चार कर्मचारी आहेत.
या कर्मचाऱ्यांना एका मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी केवळ दोनशे रुपये देण्यात येतात, यासंदर्भात प्रशासनाने काहीतरी विचार करावा अशीही मागणी आणि त्यांच्याकडून करण्यात येत आहे.
सर्वाधिक वाचल्या गेलेल्या टॉप ५ न्यूज-
'श्रीरामा'च्या अंत्यसंस्काराला 'सलमान'चा पुढाकार, हिंदू व्यक्तीच्या अंत्यसंस्कारानंतर सोडला रोजा