यवतमाळ : येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डात 81 ॲक्टिव्ह पॉझिटिव्हसह एकूण 128 जण भरती आहेत. यापैकी 47 प्रिझमटिव्ह केसेस असून गत 24 तासात चारजण भरती झाल्याचे वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने कळविले आहे. तसेच गत 24 तासात एकूण 42 रिपोर्ट महाविद्यालयाला प्राप्त झाले. यापैकी 37 निगेटिव्ह, एक पॉझिटिव्ह तर 14 दिवसांच्या कालावधीनंतर चार जणांचे नमुने पुन्हा पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची एकूण संख्या 81 आहे.
यवतमाळमध्ये 81 पॉझिटिव्ह केसेससह आयसोलेशन वॉर्डात 128 जण भरती - corona latest news yavatmal
यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डात 81 ॲक्टिव्ह पॉझिटिव्हसह एकूण 128 जण भरती आहेत. यापैकी 47 प्रिझमटिव्ह केसेस असून गत 24 तासात चारजण भरती झाल्याचे वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने कळविले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आत्तापर्यंत वैद्यकीय महाविद्यालयाने तपासणीकरीता 1 हजार 200 नमुने पाठविले. यापैकी 1 हजार 197 प्राप्त तर तीन अप्राप्त आहेत. प्राप्त झालेल्या नमुन्यांपैकी आतापर्यंत 1 हजार 106 नमुने निगेटिव्ह आले आहेत. संस्थात्मक विलगीकरणात 109 जण आणि गृह विलगीकरणात 1 हजार 117 जण आहेत. लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली आहे.
यवतमाळ नगरपालिका वगळता इतर पालिका क्षेत्रात आणि ग्रामीण भागात काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली आहे. शासन आणि प्रशासनाच्या सुचनेप्रमाणे नागरिकांनी बाहेर पडतांना मास्कचा वापर करावा. अनावश्यक गर्दी टाळावी, सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोरपणे पालन करावे. लॉकडाऊनच्या या महत्वाच्या टप्प्यातसुध्दा नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी केले आहे.