यवतमाळ - वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे आयसोलेशन वॉर्ड, विविध कोविड केअर सेंटर व कोविड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 71 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. तर जिल्ह्यात गत 24 तासात 55 जण नव्याने पॉझिटिव्ह आले असून दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला.
यवतमाळमध्ये 71 जण कोरोनामुक्त; 55 नव्याने पॉझिटिव्ह तर दोघांचा मृत्यू - यवतमाळ 55 नवीन कोरोना पॉझिटिव्ह
जिल्ह्यात सद्यस्थितीत 364 ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह असून यात होम आयसोलेशन मधील 127 पॉझिटिव्ह रुग्णांचा समावेश आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 10088 झाली आहे. गुरुवारी 71 जणांना सुट्टी मिळाल्याने सुरवातीपासून बरे झालेल्यांची एकूण संख्या 8993 आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 346 मृत्युची नोंद आहे.
मृतांमध्ये यवतमाळ शहरातील 70 वर्षीय महिला आणि नेर तालुक्यातील माणिकवाडा धनज येथील 65 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार एकूण 380 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 55 जण नव्याने पॉझिटिव्ह तर 325 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले. जिल्ह्यात सद्यस्थितीत 364 ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह असून यात होम आयसोलेशन मधील 127 पॉझिटिव्ह रुग्णांचा समावेश आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 10088 झाली आहे.
गुरुवारी 71 जणांना सुट्टी मिळाल्याने सुरवातीपासून बरे झालेल्यांची एकूण संख्या 8993 आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 346 मृत्युची नोंद आहे.