यवतमाळ -नेर शहरातील पिंताबर नगरमधील घरात भर दिवसा घरफोडी झाल्याची घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. तब्बल ५ लाखांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केल्याची माहिती आहे.
नेरमध्ये भरदिवसा घरफोडी; ५ लाखांचा ऐवज लंपास - पिंताबर नगर घरफोडी
पिंताबरनगर परिसरातील राजेश खोडके यांच्या घरी भरदिवसा घराचे कुलूप फोडून चोरट्याने प्रवेश केला. अलमारी चावीने उघडून चार तोळ्याची सोन्याची पोत २ लाख ५० हजार रुपये किंमतीच्या सोन्याच्या बांगड्या २ लाखाच्या ८ ग्रँम सोन्याचे झूमके व २० हजार रूपये नगदी एकूण ५ लाख १० हजाराचा ऐवज नेल्याची माहिती आहे.
पोलीस सूत्रानी दिलेल्या माहीतीनूसार पिंताबरनगर परिसरातील राजेश खोडके यांच्या घरी भरदिवसा घराचे कुलूप फोडून चोरट्याने प्रवेश केला. अलमारी चावीने उघडून चार तोळ्याची सोन्याची पोत २ लाख ५० हजार रुपये किंमतीच्या सोन्याच्या बांगड्या २ लाखाच्या ८ ग्रँम सोन्याचे झूमके व २० हजार रूपये नगदी एकूण ५ लाख १० हजाराचा ऐवज नेल्याची माहिती आहे. यावेळी राजेश खोडके हे परिवारासह वणी येथे गेले होते. हा प्रकार त्यांच्या बाजूला राहणाऱ्या बहीणीला लक्षात आला. तिने घटनेची माहीती खोडके यांना दिली. त्यानंतर याबाबत पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. सीसीटीव्हीची चाचणी ठाणेदार ज्ञानेश्वर घुगे करत आहे. विषेश म्हणजे चोरट्यांना अलमारीच्या चावी बाबत कल्पना असल्याचे पुढे आले आहे. या घटनेचा तपास नेर पोलीस करत आहे.
हेही वाचा -नागपुरात किरकोळ वादातून तरुणाची हत्या; तीन आरोपींना अटक