यवतमाळ - राज्यात मागील आठ दिवसांपासून कुठे मुसळधार, तर कुठे रिमझिम पाऊस पडत आहे. त्यामुळे, विदर्भ आणि मराठवाड्याच्या सीमेवरील पैनगंगा नदी काठावरील 47 गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिलेला आहे. तसेच वर्धा नदीवरील बाभुळगाव, कळंब आणि राळेगाव या तीन तालुक्यांतील नदीकाठच्या गावांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या पावसामुळे उमरखेड तालुक्यातील 98 घरांची पडझड झाली आहे. तर, यवतमाळ तालुक्यात बेचखेडा येथील दोन घरांची पडझड झाली आहे.
यवतमाळमधील 47 गावांना सतर्कतेचा इशारा; पावसाने उमरखेडमधील 98 घरांची पडझड - विदर्भ
जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे. या पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आला आहे. पुसद, बिटरगाव, खरुज, मुळावा या गावांना जाणारे प्रमुख मार्ग पाण्यामुळे बंद झाले होते. तर, पुरामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.
जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे. या पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आला आहे. पुसद, बिटरगाव, खरुज, मुळावा या गावांना जाणारे प्रमुख मार्ग पाण्यामुळे बंद झाले होते. सततच्या पावसामुळे विहिरी, हातपंप व प्रकल्पांतील जलसाठ्याच्या पातळीत वाढ झाली आहे. तर, पुरामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.
जिल्ह्यात दोन दिवसांपूर्वी 410 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. त्यामध्ये उमरखेड येथे 73 मिलीमीटर पाऊस पडला. त्याखालोखाल पुसद (45 मिमी) , दिग्रस (42 मिमी) , महागाव (26 मिमी) , वणी (26 मिमी), कळंब (24 मिमी), मारेगाव (23 मिमी), आर्णी (22 मिमी), बाभूळगाव (20 मिमी), केळापूर (18 मिमी), राळेगाव (18 मिमी), यवतमाळ (16 मिमी), घाटंजी (15 मिमी), झरीजामणी (13 मिमी), दारव्हा (13 मिमी) आणि नेर तालुक्यात 10 मिलीमीटर पावसाची नोंद झाली.