महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पैनगंगा अभयारण्याच्या बंदी भागातील ४५ हजार मतदारांचा निवडणुकीवरील बहिष्कार मागे

या बैठकीमध्ये जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी सर्व मागण्या संदर्भात सविस्तर चर्चा करून नागरिकांचे समाधान केले. तसेच समस्यांचा कृती आराखडा तयार करून मागण्या लवकरात पूर्ण करण्यासाठी एक कालबद्ध कार्यक्रम राबवणार असल्याचेही सांगितले.

४५ हजार मतदारांचा मतदानावर बहिष्कार मागे

By

Published : Apr 17, 2019, 1:20 PM IST

यवतमाळ- पैनगंगा अभयारण्यातील जवळपास ३५ गावे मुलभुत सुविधेपासून वंचित असल्याने या गावातील नागरिकांनी लोकसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकला होता. या गंभीर बाबीची दखल जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी घेत गावकऱ्यांना समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले.

४५ हजार मतदारांचा मतदानावर बहिष्कार मागे

जिल्हाधिकाऱ्यांनी मोरचंडी गावात जावून पैनगंगा अभयारण्य संघर्ष समितीसोबतच गावकऱयांशी चर्चा केली. यावेळी सर्व समस्या सोडविण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी यांनी दिल्याने गावकऱ्यांनी बहिष्कार आंदोलन येत्या विधानसभेपर्यंत स्थगित केल्याचे जाहीर केले. पैनगंगा अभयारण्यातील ३० गावांतील नागरिकांनी एकत्रित येऊन संघर्ष समिती तयार केली होती.
आपल्या ११ विविध मागण्यासंदर्भात महिनाभरापूर्वी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकल्याचे या गावांतील नागारिकांनी प्रशासनाला कळविले होते. अभयारण्यातील भोगवटदार क्रमांक २ ची जमीन क्रमांक १ मध्ये करणे, शिक्षक व आरोग्य विभागातील कर्मचारी यांचा अनुशेष भरून काढणे, वनहक्क दावे मंजूर करणे अशा विविध मागण्या पूर्ण करण्यात याव्यात, अशी मागणी गावकऱ्यांनी केली होती. अखेर जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी या गावात भेट देऊन गावातील गावकऱ्यांसोबत चर्चा केली. यावेळी सर्वात महत्त्वाच्या रस्त्याच्या मागणीचे अंदाजपत्रक तयार झाले असून लवकरच प्रस्ताव दाखल करण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकारी यांनी गावकऱ्यांना सांगितले.

या बैठकीमध्ये जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी सर्व मागण्या संदर्भात सविस्तर चर्चा करून नागरिकांचे समाधान केले. तसेच समस्यांचा कृती आराखडा तयार करून मागण्या लवकरात पूर्ण करण्यासाठी एक कालबद्ध कार्यक्रम राबवणार असल्याचेही सांगितले. संविधानाने दिलेला हक्क व ताकद गमावू नका, असे भावनिक आवाहनही जिल्हाधिकारी यांनी येथील ४५ हजार मतदारांना केले.

ABOUT THE AUTHOR

...view details