यवतमाळ- वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डात 45 ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांसह एकूण 65 जण भरती आहेत. यात 20 प्रिझमटिव्ह केसेस असल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने कळविले आहे. मागील 24 तासात वैद्यकीय महाविद्यालयाला 37 रिपोर्ट प्राप्त झाले यापैकी 33 रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. 4 रिपोर्टचे अचूक निदान नसल्यामुळे त्यांचे नमुने तपासणीकरीता पुन्हा पाठविण्यात येणार आहेत.
यवतमाळमध्ये अॅक्टिव्ह कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 45; संसर्गाचा वेग मंदावला
यवतमाळमध्ये कोरोना संसर्गाचा वेग मंदावल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात 45 अॅक्टिव्ह कोरोनाबाधित रुग्ण आहेत. 53 कोरोनाबाधित रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत.
यवतमाळमध्ये संस्थात्मक विलगीकरणात 11 जण तर गृह विलगीकरणात एकूण 1113 जण आहेत. जिल्ह्यात काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांचा वेग मंदावला असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण 53 जण बरे झाले आहेत.
नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टीने शासन आणि प्रशासनाला सहकार्य करावे. नियमित मास्कचा वापर करावा. विनाकारण घराच्या बाहेर पडू नये. अत्यावश्यक कारणासाठी बाहेर जावे लागल्यास सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.