यवतमाळ- वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विलगीकरण कक्षात एकूण ४० जण भरती आहेत. त्यांची प्रकृती चांगली आहे. यापैकी ३१ जणांचे नमुने नागपूर येथील इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठविण्यात आले असून त्यांचे रिपोर्ट अध्याप मिळालेले नाही, अशी माहिती महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे यांनी दिली आहे.
यवतमाळातील शासकीय रुग्णालयात ४० कोरोनाबाधित भरती; रुग्णांची प्रकृती सामान्य - vasantrao naik government hospital
जिल्ह्यात बाहेरून आलेल्या नागरिकांनी किंवा त्यांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांनी स्वत:हून समोर येऊन आपली माहिती प्रशासनाला द्यावी. बाहेरून आलेल्या ज्या नागरिकांनी अद्यापही प्रशासनाशी संपर्क साधला नाही त्यांनी ०७२३२- ०४०७२०, ०७२३२-२३९५१५, तसेच टोल फ्री क्र. १०४ वर त्वरित संपर्क करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी केले आहे.
काल पुन्हा ९ जणांचे नमुने कोरोना चाचणीसाठी पाठविण्यात आले होते. मात्र, त्यांचे अहवाल अद्याप आलेले नाही. संपूर्ण जिल्ह्यात गृह विलगीकरणात असलेल्या नागरिकांची संख्या १०३ आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विलगीकरण कक्षात २३० बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्ह्यात बाहेरून आलेल्या नागरिकांनी किंवा त्यांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांनी स्वत:हून समोर येऊन आपली माहिती प्रशासनाला द्यावी. बाहेरून आलेल्या ज्या नागरिकांनी अद्यापही प्रशासनाशी संपर्क साधला नाही त्यांनी ०७२३२- ०४०७२०, ०७२३२-२३९५१५, तसेच टोल फ्री क्र. १०४ वर त्वरित संपर्क करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी केले आहे.
हेही वाचा-कोरोनाचा व्हायरस दोन वेळा लग्न मुहूर्ताला डसला, नववधूने स्कुटीवरुन सासर गाठून संसार थाटला