यवतमाळ - वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डात 10 पॉझिटिव्ह रुग्ण भरती होते. यापैकी 4 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह निघाले असून, त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. पुढील 14 दिवस ते आरोग्य विभागाच्या निगराणीखाली गृह विलगीकरणात राहणार आहेत. 4 पॉझिटिव्ह रुग्ण बरे झाल्यामुळे जिल्ह्याला मोठा दिलासा मिळाला आहे.
यवतमाळमध्ये 10 पॉझिटिव्ह रुग्णांपैकी 4 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह
वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डात 10 पॉझिटिव्ह रुग्ण भरती होते. यापैकी 4 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह निघाले असून, त्यांना सुट्टी देण्यात आली आहे.
यवतमाळमध्ये 10 पॉझेटिव्ह रुग्णांपैकी 4 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह
आता आयसोलशन वॉर्डात पॉझिटिव्ह असलेले 6 रुग्ण भरती आहेत. या सहा जणांची तब्बेत चांगली असून यापैकी एका जणाची प्रकृती थोडी चिंताजनक होती, ती पण आता स्थिर असल्याची माहिती जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांनी दिली. आयसोलेशन वॉर्डात एकूण 57 जण भरती आहे. गत 24 तासात एक जण भरती झाला असून शनिवारी एकूण 38 नमुने तपासणीकरिता नागपूरला पाठवले आहेत. जिल्ह्यात गृह विलगीकरणात असलेल्यांची संख्या एकूण 767 आहे. तर संस्थात्मक विलगीकरणात 34 जण दाखल आहे.