यवतमाळ - जिल्ह्यातील आर्णी जवळील कोळवनगावाजवळ मंगळवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास परप्रांतीय मजुरांना घेऊन जाणाऱ्या एसटीने उभ्या टिप्परला मागून जोरदार धडक दिली. या अपघातात बसमधील 4 प्रवासी जागीच ठार झाले तर, 22 गंभीर व्यक्ती जखमी झाले आहेत. यातील एकाची प्रकृती चिंताजनक असून त्याला यवतमाळ जिल्हा शासकीय वैद्यकीय रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. ही एसटी सोमावीर रात्री सोलापूरहून झारखंडच्या प्रवाशांना घेऊन जात होती.
परप्रांतीय मजुरांना घेऊन जाणाऱ्या एसटीची टिप्परला धडक; 4 ठार, 22 गंभीर - yavatmal migrant workers news
मजुरांना त्यांच्या गावाला घेऊन जाणाऱ्या एसटी बसने उभ्या टिप्परला मागून जोरदार धडक दिली. या अपघातात बसमधील 4 प्रवासी जागीच ठार झाले तर, 22 व्यक्ती जखमी झाल्याची घटना मंगळवारी पहाटे साडेतीन वाजताच्या सुमारास आर्णी जवळील कोळवनगावाजवळ घडली.
सध्या लॉकडाऊनमुळे अडकून पडलेल्या प्रवाशांना शासनाच्या निर्देशानुसार एसटी बसेसने त्यांच्या राज्याच्या सीमेवर सोडण्यात येत आहे. सोमवारी रात्री सोलापूर येथून झारखंडच्या परप्रांतीय प्रवाशांना घेऊन एसटी बस (एमएच 14 बीटी 4651) निघाली. मध्यरात्रीच्या सुमारास आर्णी जवळच्या कोळवणगावाजवळ उभ्या असलेल्या टिप्परला (टीएस 07 यूए 2608) या बसने मागून जोरदार धडक दिली. या घटनेत 4 प्रवासी जागीच ठार झाले. तर, 22 जण गंभीररित्या जखमी झाले असून एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.
जखमींना उपचारासाठी आर्णी आणि यवतमाळ येथे दाखल करण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच आर्णी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळी दाखल झाले आणि जखमींना उपचारासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले.