यवतमाळ : लग्न सोहळ्यावरून परत येत असलेल्या कार व बसची समोरासमोर धडक ( accident between car and bus ) झाली. यामध्ये 4 जण जागीच ठार झाले तर 13 जण जखमी ( 4 died and 13 injured in accident ) झाले. अपघाताची ही घटना रविवारी सकाळी 11 वाजताच्या सुमारास यवतमाळ अमरावती मार्गावर लोणी येथे घडली.
Accident News : यवतमाळ अमरावती मार्गावर भीषण अपघात, 4 जण ठार तर 13 जखमी.. - अपघातात चौघांचा मृत्यू
यवतमाळ अमरावती महामार्गावर ( Yavatmal Amravati highway ) लोणी येथे रविवारी सकाळी 11 वाजता कार व बसची समोरसमोर धडक होऊन भीषण अपघात ( accident between car and bus ) झाला आहे. अपघातात 4 जण ठार झाले असून 13 जण जखमी ( 4 died and 13 injured in accident ) झाले आहेत. लग्ना सोहळ्यावरून परतत असताना हा अपघात झाला आहे.
अपघातात चौघांचा मृत्यू :मिळालेल्या माहितीनुसार गावंडे, चौधरी व इंगोले कुटुंब हे 3 डिसेंबर रोजी लग्न सोहळ्यानिमित्त नांदगाव खंडेश्वर जिल्हा अमरावती येथे टियागो कार क्रमांक एम एच 29 बीसी 9173 ने गेले होते. त्यानंतर आज सकाळी अमरावती येथे देवीचे दर्शन घेऊन यवतमाळकडे परत येत असताना विरुद्ध दिशेने जात असलेल्या एसटी बस क्रमांक एम एच 06/ 8826 ची कारला समोरासमोर धडक झाली. हा अपघात एवढा भीषण होता की, यामध्ये वाहनातील चौघांचा मृत्यू झाला.
तिघांची प्रकृती गंभीर : रजनी अशोक इंगोले ( 47), राधेश्याम अशोक इंगोले (27), वैष्णवी संतोष गावंडे ( 22), सारिका प्रमोद चौधरी सर्व रा. यवतमाळ व कनेरगाव जि.वाशिम असे मृतांची नावे आहेत. तर साक्षी प्रमोद चौधरी ( 17) रा. पिंपळगाव वाशीम, प्रमोद पांडुरंग चौधरी ( 45), सविता संतोष गावंडे, सचिन नारायण शेंद्रे रा.यवतमाळ, धनंजय माधव मिटकरे असे अपघातातील जखमींची नावे आहेत.अपघातात सहा जण गंभीर जखमी झाले आहे. यातील तिघांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने उपचाराकरिता नागपूर येथे रवाना करण्यात आले आहे.