यवतमाळ - जिल्ह्यात गत सहा दिवसापासून मृत्यूचे तांडव सुरू असून 174 बधितांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत एकाच दिवशी 39 बाधितांचा मृत्यू होण्याची ही पहिलीच वेळ आहे. 929 जण नव्याने पॉझिटिव्ह आले, असून 885जण कोरोनामुक्त झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.
कोरोनात मृत्यूचे तांडव; एकाच दिवसी 39 मृत्यू तर 929 जण पॉझिटिव्ह - यवतमाळ कोरोना अपडेट
यावतमाळमध्ये एकाच दिवसी 39 मृत्यू झाले असून 929 जण पॉझिटिव्ह आहेत. 24 तासात कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 36487 आहे.
5729 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 929 जण नव्याने पॉझिटिव्ह आले तर 4800 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 5758 रुग्ण ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह असून यापैकी रुग्णालयात भरती 3052 तर गृह विलगीकरणात 2706 रुग्ण आहेत. आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 43236 झाली आहे. 24 तासात 885 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 36487 आहे. तर जिल्ह्यात एकूण 991 मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 11.96 असून मृत्युदर 2.29 आहे.